Saturday 28 March 2020

स्मॉग आणि वायू म्हणजे काय?


स्मॉग म्हणजे काय ?
' स्मॉग ' हा इंग्रजी शब्द ' स्मोक ' व ' फॉंग ' या दोन शब्दांपासून निर्माण झाला आहे . त्याला मराठीत ' धुकेमिश्रित धूर ' हा प्रतिशब्द आहे . कारखान्यांच्या चिमण्यांमधून वातावरणात धुराचे लोट ओकले जातात . अशा वेळी थंडीच्या दिवसांत वातावरणात धुके असेल तर त्या धुक्यात धूर मिसळला जातो . त्यामुळे वातावरण दाट बनते .
हवेला हालचाल करायला वाव मिळत नाही . लोकांना श्वास घेणे अवघड जाते व ते खोकू लागतात . धुकेमिश्रित धूर जर त्यांच्या छातीत गेला तर त्यांच्या फुफ्फुसांना अपाय होतो . या वातावरणात धूळ अधांतरी ओठंगत राहते . त्यात वाहनांमधून बाहेर पडणारा धूर मिसळला जातो . एकूण वातावरणा दूषित , अपायकारक बनते . हवेत धुळीचे प्रमाण महाप्रचंड असते . माणसांच्या हालचालींमुळे , निसर्गात घडणान्या हालचालीमुळे धूळ हवेत मिसळली जाते . मोठ्या औद्योगिक शहरांमध्ये हवेत कित्येक टन धूळ असते . धुकेमिश्रित धूर जास्तीत जास्त प्रमाणात कमी केला पाहिजे . पाण्याचे फवारे मारले पाहिजेत .
* वायू म्हणजे काय ?
ग्रीस देशातील गोष्ट . एक मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना उघड्या माळरानावर चारत होता . एका ठिकाणी जमिनीमधून काहीतरी वर चढते आहे असे त्या मेंढपाळाने पाहिले . त्या ठिकाणी गेलेल्या मेंढ्या विचित्र वागू लागल्या . तेथे गेलेले लोक काहीतरी वेडेवाकडे बडबडू लागले व त्यांची डोकी हलकी बनली . ग्रीकांना वाटले की , तेथे एका ' भुताचा निवास आहे ! म्हणून त्यांनी देवाचे मंदिर त्या ठिकाणी बांधले . ते ' भूत ' म्हणजे नैसर्गिक वायू. वायूचे तीन मुख्य प्रकार आहेत : नैसर्गिक वायू , कोळशाचा वायू व पाण्याचा वायू . जगात अनेक ठिकाणी नैसर्गिक वायूचे साठे आहेत . पृथ्वीचे कवच घडताना भूगर्भात जे बदल घडून आले त्यांचा परिणाम म्हणजे नैसर्गिक वायूची निर्मिती ! नलिकामागामार्फत हा वायू हजारो मैल दूरच्या शहरांपर्यंत पोहोचविला जातो व त्याचा घरगुती आणि औद्योगिक कामांसाठी वापर केला जातो . कोळशाच्या भुकटीपासून कोळशाचा वायू मोठ्या भट्टयांमध्ये निर्माण केला जातो . या भट्टया हवाबंद करतात व विशिष्ट प्रमाणापर्यंत तापवतात . कोळशामधून निघालेला वायू नलिकांमार्फत दूर वाहून नेतात .
हा वायू एका मोठ्या कंटेनरमध्ये गोळा करतात . तेथे अशुद्ध घटक बाजूला काढतात . शेवटी शुद्ध वायू मीटरमार्फत तपासला जातो . नंतर घरांमध्ये तो इंधनासाठी वापरतात .
* जगात आज सुमारे पाच हजार भाषा व बोली आहेत . त्यांपैकी भारतात किती आहेत ?
सुमारे ८४५ .
* रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या कवितेतील कोणत्या ओळी पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या मरणाच्या आदल्या दिवशी कागदावर लिहून ठेवल्या होत्या ?
' The woods are lovely . dark and deep . But I have promises to keep , and miles to go before I sleep "
रॉबर्ट फ्रॉस्ट ( १८७५ - १९६३ ) यांच्या ' Stopping by woods on a snowy evening ' मधून .


No comments:

Post a Comment