Monday 2 March 2020

ऑक्सिजनशिवाय जगणाऱ्या सजीवाचा शोध

पृथ्वीवर जगण्यासाठी प्राणवायू ऑक्सिजनची आवश्यकता असते, याची माहिती शालेय अभ्यासक्रमात झाली. प्राणवायूशिवाय जीवसृष्टी तग धरूच शकत नाही, हा सिद्धांतही विज्ञानात मान्य झाला. मात्र, याच सिद्धांताला आव्हान देणारे नवे संशोधन समोर आले आहे. पृथ्वीवर जगण्यासाठी प्राणवायू ऑक्सिजनची आवश्यकता असते, याची माहिती शालेय अभ्यासक्रमात झाली. प्राणवायूशिवाय जीवसृष्टी तग धरूच शकत नाही, हा सिद्धांतही विज्ञानात मान्य झाला. मात्र, याच सिद्धांताला आव्हान देणारे नवे संशोधन समोर आले आहे. प्राणवायूशिवायही जगू शकणारा सजीव शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे. हेनेगिया सॅमिनिकला असे या सजीवाचे नाव आहे.

विज्ञान संशोधनविषयक नियतकालिकात याबाबतची संशोधन माहिती प्रकाशित झाली आहे. हेनेगिया सॅमिनिक हा परजीवी सजीव आहे. जेलीफिश आणि कोरल वर्गातील प्रजाती आहे. श्वसन प्रक्रिया या परपोषी सजीवात सुरू नसल्याचे समोर आले आहे असल्याची माहिती तेल अवीव विद्यापीठाचे प्रा.डोरोथी हचॉन यांनी सांगितले.
ऑक्सिजन हे सजीवांना जगण्यासाठी आवश्यक आहे. मात्र, या सजीवाला जगण्यासाठी आवश्यक नाही. अमिबा, बुरशी, सिलिएट लिनिअजसारख्या सजीवांमधील श्वास घेण्याची क्षमता कालांतराने नाहीशी झाल्याचे त्यांनी सांगितले. हेनेगिया सॅमिनिक या परजीवी सजीवाचा लागलेला शोध योगायोगाने लागला असल्याचे त्यांनी म्हटले.

No comments:

Post a Comment