Friday 17 April 2020

लॅपटॉपवर काम करताना अशी काळजी घ्या

सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने अनेक कंपन्यांचे कर्मचारी घरातूनच काम करीत आहेत . ' वर्क फ्रॉम होम ' सुरू असताना सतत लॅपटॉपचा वापर केल्यानेही डोळ्यांसाठी काही समस्या निर्माण होऊ शकतात . ते टाळण्यासाठी काय करावे याची ही माहिती . . .

अनेक कर्मचारी सध्या घरीच सुमारे आठ ते दहा तास लॅपटॉपवर काम करीत आहेत , अनेक विद्यार्थीही लॅपटॉपचा वापर करतात . मात्र , सतत लॅपटॉपसमोर बसणे डोळ्यांसाठी त्रासदायक ठरू शकते . सतत स्क्रिनवर बघत राहिल्याने डोळ्यांवर ताण येतो . तासन्तास स्क्रिनसमोर बसल्याने ' ड्राय आईज ' ची समस्याही निर्माण होऊ शकते . ' मेडिकल रिसर्च अँड ओपिनियन ' मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार सतत लॅपटॉपचा असा वापर केल्याने डोळे कोरडे पडण्याची समस्या निर्माण होते व त्याचा परिणाम केवळ आरोग्यावरच नव्हे तर तुमच्या कार्यक्षमतेवरही होऊ शकतो . ' ड्राय आईज ' म्हणजे डोळ्यांचा ओलावा कमी होणे . डोळ्यांमध्ये अश्रू किंवा पाणी कमी बनणे . डोळे कोरडे वाटणे , खाज किंवा जळजळ होणे , डोळे सतत चोळावेसे वाटणे ही त्याची लक्षणे असू शकतात . त्याशिवाय डोळ्यांमध्ये सतत काही तरी गेल्यासारखे वाटणे , डोळे बारीक होणे अशीही लक्षणे असतात . लॅपटॉपशिवाय वाढते प्रदूषण , सतत एसीचा वापर , ताणतणाव , उच्च रक्तदाब हीसद्धा याची काही कारणे आहेत . ड्राय आईज ' ची समस्या टाळण्यासाठी हे करावे . . . *काम करताना प्रत्येक तासाला पंधरा ते वीस मिनिटांचा ब्रेक घ्यावा आणि एखाद्या दूरवरच्या वस्तूकडे , दृश्याकडे पाहावे . त्यामुळे डोळ्यांचा ताण कमी होतो .
*लॅपटॉपच्या कामातून ब्रेक घेतल्यावर लगेचच मोबाईल किंवा टीव्हीवर नजर खिळवून राहू नका !
* कुटुंबातील इतरांशी संवाद साधणे , संगीत - गाणे वगैरे मनोरंजन करणे अशा गोष्टी कराव्यात . डोळे लाल होत असल्यास , डोळ्यांमध्ये खाज , जळजळ येत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही आयड्रॉपचा वापर करू नये .
*चश्मा वापरत असाल तर तो नेहमी स्वच्छ ठेवा .
* डोळ्यांना सतत हात लावू नका .
*झोपून लॅपटॉपवर काम करू नका .
*अगदी कमी उजेड असलेल्या खोलीत लॅपटॉपवर काम करू नका .

No comments:

Post a Comment