Sunday 26 April 2020

ज्ञान वाटिका

देश मोठा, पण नदी नाही
 जगात असे अनेक देश आहेत, जिथे नदी नाही, अशा देशांमध्ये सौदी अरेबियादेखील सामिल आहे.या देशात मक्का आणि मदिना हे पवित्र धार्मिक क्षेत्र आहेत.  हा जगातील 13 वा आणि आशिया खंडातला पाचवा सर्वात मोठा देश आहे.  नदी नसल्यामुळे समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करून लोकांपर्यंत पोहोचवले जाते.  तेलाच्या साठ्यामुळे या देशात पैशांची कमतरता नाही. त्यामुळे येथील लोकांना जवळपास मोफत पाण्याचा पुरवठा केला जातो.


 जलमहाल
 जय महाल, जयपूरच्या मनसागर तलावाच्या मध्यभागी वसलेला आहे.  या महालाची इमारत पाच मजली आहे. विशेष गोष्ट अशी की, जेव्हा सरोवर  पूर्ण भरलेला असतो, तेव्हा या महालाचे चार मजले पाण्यात बुडतात. फक्त वरचा भाग पाहायला मिळतो. अठराव्या शतकात बांधलेला हा जल महाल सरोवराच्या काठावरूनच पाहता येतो.  या महालात जाण्याची परवानगी नाही.

 तोडताच कोमेजणारे  फूल
 श्रीलंकेत सापडणारे 'कडाफुल'  खूप वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. याचे कारण त् म्हणजे हे फूल क्वचितच पाहायला मिळते. जिथे ही फुले सापडतात, तिथे  ती फक्त मध्यरात्रीच फुलतात. तर पहाट होण्याआधीच ते कोमेजू लागतात.  त्याहूनही अधिक मनोरंजक गोष्ट  म्हणजे हे फूल तोडले की लगेच कोमेजायला लागते. हे फूल  विक्रीसाठी तोडणे  म्हणजे फारच कठीण आहे.  म्हणूनच हे अद्वितीय फूल फारच थोडे लोक पाहू शकतात.

 पेंग्विन उडत नाहीत
 अंटार्क्टिका येथील रहिवासी असलेला पेंग्विन  हा एक जलीय पक्षी आहे , जो उडू शकत नाही. थंड आणि बर्फाळ भागातील रहिवासी असलेल्या पेंग्विनचे ​​अर्धे आयुष्य जमिनीवर जाते. सर्वात मोठ्या एम्पेरर पेंग्विनचे ​​वजन सुमारे 35 किलो असते.  तर सर्वात लहान फेयरी  पेंग्विनचे ​​वजन फक्त एक किलोग्राम असते. जर पेंग्विनच्या लहान पिलाचा मृत्यू झाला तर त्याऐवजी  ते दुसर्‍या पेंग्विनच्या मुलाची चोरी करण्याचा प्रयत्न करतात.

 सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार
 1967 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सुरू झाला. बंगाली चित्रपटांचा नायक उत्तम कुमारने पहिल्यांदाच 'एंथोनी फिरंगी' आणि 'चिडियाखाना' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला होता, या नंतर हा पुरस्कार  भारत सरकार राष्ट्रीय पुरस्कार म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे 1975 मध्ये या पुरस्काराला  सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा रजतकमल पुरस्कार  म्हटले जाऊ लागले.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत

 प्रश्न आणि उत्तर
 १) औरंगजेबच्या आजोबांचे नाव होते-
 अ) बाबर ब) शाहजहां क) अकबर ड) जहांगीर

 २) अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात तिहेरी भूमिका केली-
 अ) शहेनशहा ब) महान क) आखरी रास्ता ड) अदालत

 ३) चंद्रगुप्त (हिंदी) नाटकाचे नाटककार -
 अ) जयशंकर प्रसाद ब) नरेंद्र कोहली क) प्रेमचंद्र
ड)सुमित्रानंदन पंत
 ४) ऑलिम्पिकमध्ये भारताने प्रथमच हॉकीचे सुवर्ण जिंकले -
 अ) 1928 ब) 1932 क) 1952 ड) 1980

 ५) दार्जिलिंग हा या राज्याचा एक भाग आहे-
 अ) हिमाचल प्रदेश ब) सिक्किम क) पश्चिम बंगाल ड) उत्तराखंड

 ६) राजा रवि वर्मा कोण होते?
 अ) चित्रकार ब) नेता क) अभिनेता ड) खेळाडू

 ७) हे शहर समुद्राजवळ नाही-
 अ) चेन्नई ब) कोलकाता क) मुंबई ड) पुरी

 (उत्तर - 1-ड,  2-ब, 3-अ, 4-क,  5-क, 6-अ,  7-ब)
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत

No comments:

Post a Comment