Thursday 30 April 2020

डिस्टन्सिंग, क्वारंटाईनला इतिहास 700 वर्षांपासूनचा

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सध्या जगभरात लोकांना क्वारंटाईन केले जाते आहे. महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणार्‍या लोकांना सोशल डिस्टंसिंगचा सल्ला देत आहे. २१ व्या शतकात व्हायरसपासून बचावासाठी असलेले हे सोशल डिस्टन्सिंग आणि क्वारंटाईन आता सर्वांनाच माहिती झाले आहे. मात्र याचे महत्त्व तब्बल ७00 वर्षांपूर्वी लोकांना समजले होते.
प्लेग म्हणजेच काळा आजार यापासून वाचण्यासाठी लोकांना क्वारंटाईन केले जाऊ लागले. लोकं सोशल डिस्टंसिंगचे पालन करू लागले. १३४८ च्या दरम्यान हे प्रचलित झाले होते. ऑक्टोबर १३४७ साली जेव्हा १२ जहाज इटलीच्या सिसली बंदरावर होत्या. त्या जहाजातील प्रवाशांचे कुटुंब किनार्‍याजवळ त्यांची वाट पाहत होते. मात्र खूप वेळ जहाजातून कोणी उतरले नाही म्हणून ही लोकं जहाजात गेली तर जहाजात मृतदेहांचा खच होता. काही लोकंच जिवंत होती. त्यांना जहाजाबाहेर आणण्यात आले. त्यांची हालतही फारशी चांगली नव्हती. ही लोकं बरी झाली नाहीत. मात्र त्यांच्यावर उपचार करणारी लोकंही आजारी पडू लागली.
आजाराची सुरुवात चीनहून झाली, जिथे व्यापारासाठी इटलीतील जहाज गेले होते. जहाज इटलीला पोहोचल्यानंतर मिलान आणि वेनिससारख्या शहरातून हा आजार ८ महिन्यांत इटली, स्पेन, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रिया, हंगेरी, स्वित्झलर्ंड, र्जमनी, स्कँडिनेविया आणि बॉल्टिकला पोहोचला. पुढील पाच वर्षांत या १२ जहाजांमुळे युरोपमध्ये एक तृतीयांश लोकसंख्येचा बळी गेला. लोकं काळी पडून मरू लागली. त्यामुळे या आजाराला ब्लॅक डेथ, काळा आजार म्हटले जाऊ लागले. नंतर ब्युबोनिक प्लेग असे नाव देण्यात आले.
त्यावेळी शास्त्रज्ञांना व्हायरस, बॅक्टेरिया याबाबत माहिती नव्हती. मात्र हा आजार माणसा-माणसांमध्ये पसरतो आहे, हे समजले. त्यानंतर या आजाराने प्रभावित झालेल्या युरोपियन देशांमध्ये सोशल डिस्टंसिंगला सुरुवात झाली. ऑक्सफर्ड ब्रुक्स युनिव्हर्सिटीतील आधुनिक युरोपियन इतिहासाचे प्राध्यापक जेन स्टिव्हन क्रॉशॉ यांच्या मते, इतक्या वर्षांपूर्वी लोकांना समजले की आजार एकमेकांना स्पर्श केल्याने, संक्रमित वस्तूंना स्पर्श केल्याने किंवा संक्रमित ठिकाणी आल्याने पसरू शकतो. त्यामुळे लोकांना यापासून वाचण्याचा सल्ला देण्यात आला.
जहाज, लोकांना क्वारंटाईन करण्यात आले
युरोपमध्ये दुसर्‍या देशांहून परतलेल्या जहाजांमधील नाविकांसह प्रवाशांना क्वारंटाईन राहण्यास बंधनकारक करण्यात आले. याचे दस्तावेजही मिळालेत. २७ ऑक्टोबर, १३७७ ला शहाराच्या मेजर काऊन्सिलने एक नियम जारी केला. ज्यामध्ये प्लेग प्रभावित क्षेत्रांहून परतललेल्या जहाजांना एक महिना क्वारंटाईन पूर्ण होईपर्यंत शहराच्या आत येण्यास परवानगी नव्हती.
आई झाल्यानंतर ४0 दिवसांचा क्वारंटाईन
सुरुवातीला आयसोलेशनचा कालावधी ३0 दिवसांचा होता, ज्याला ट्रेन्टीनो म्हटले जायचे. त्यानंतर विशिष्ट परिस्थितीत हा कालावधी ४0 दिवसांचा करण्याची परवानगी डॉक्टरांना मिळाली. क्वारंटाईन शब्द इटालियन शब्द क्वारंटिनोपासून आला आहे, ज्याचा अर्थ होता ४0 दिवसांचा एकांत. प्राध्यापक स्टिव्हन यांच्या मते, क्वारंटाईन पीरियड दुसर्‍या प्रकरणांमध्येही दिसून आले. मुलांच्या जन्मानंतर ४0 दिवसांपर्यंत आईला वेगळे ठेवले जाऊ लागले.

No comments:

Post a Comment