Tuesday 14 April 2020

अशी वाढवा स्मरणशक्ती

एकाग्रता आणि स्मरणशक्ती यांच्या सहाय्याने उत्तम यश संपादन करता येते . म्हणूनच स्वामी विवेकानंद एकाग्रता आणि स्मरणशक्तीला " यशाची गुरुकिल्ली " असे म्हणत . एकाग्रता म्हणजे आपल्या ध्येयावर लक्ष पूर्णपणे केंद्रित करणे . आपण निश्चित केलेले लक्ष किंवा साध्य पूर्ण होण्यासाठी झोकून देऊन आणि हाती घेतलेले काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे . आपण जागेपणी जे ऐकतो , पाहतो , वाचतो , स्पर्श करतो , गंध घेतो या सर्व गोष्टी आपण झोपेत असताना मेंदूत साठवून ठेवत असतो . मेंदूत साठवून ठेवलेले हवे तेव्हा , हवे ते , हव्या त्या स्वरूपात आठवणे म्हणजे स्मरणशक्ती होय ,

स्मरणशक्ती वाढविण्यासाठी . . .
 • प्रवासात किंवा रात्री झोपताना दिवसभरात घडलेल्या महत्वाच्या गोष्टी , नव्या शिकलेल्या गोष्टी आठवाव्यात .
 •विविध प्रकारचे खेळ खेळावेत , विविध प्रकारच्या भेंड्या लावणे , गोष्ट सांगणे , कविता सादर करणे असे प्रकार करावेत .
• विशिष्ट ढंगात विनोद सांगणे , प्रश्नमंजूषा , सुडोकू , शाब्दिक कोडी सोडवावीत .
•आपल्याला जी गोष्ट करायची आहे , त्यावर लक्ष एकाग्र करण्याची सवय लावून घ्यावी .
हे व्यायाम उपयोगी . . .
* जमिनीपासून पाय उचलून तोल साधण्याचा प्रयत्न केल्यास मेंदू सजग होऊन त्याची कार्यक्षमता वाढते .
•सूर्यनमस्कार , एरोबिक्स ,योगासने नियमित करावीत .
मोबाईलचा असा उपयोग करावा . . .
*  सध्या मोबाईलवरही स्मरणशक्ती वाढविण्यासाठी विविध खेळ उपलब्ध आहेत . त्या खेळांनी स्मृतीभ्रंश टाळता येतो .
• मेंदू तल्लख करण्यासाठीही काही प्रमाणात उपयोग होऊ शकतो .
• वयोमानानुसार विविध खेळ खेळता येऊ शकतात .
• अशा खेळांसाठी विविध प्रकारचे अॅपदेखील उपलब्ध आहेत ,
हे खेळ डाऊनलोड करण्यापूर्वी त्याचे संशोधन झाले आहे का ? हे पाहावे . त्यावरील प्रतिक्रिया पाहून मगच अॅप डाऊनलोड करावेत . अॅपवरचे खेळ मुलांना खेळायला देण्यापूर्वी पालकांनी ते खेळ स्वतः खेळून पाहावेत .
* वाचन , मनन आणि चिंतन या तीन प्रकारातून स्मरणशक्ती वाढते . तसेच विविध खेळ खेळूनही मेंदूची क्षमता वाढवता येते . एकाग्रता वाढीसाठीही या खेळांचा उपयोग होतो . योगासनांमुळे मन बळकट होण्यास मदत होते .

No comments:

Post a Comment