Wednesday 22 April 2020

वाढवा आपले सामान्य ज्ञान

१) नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलं आहे?
२) हरितद्रव्य नसणारी वनस्पती कोणती?
३) भारतातील उदारमतवादाचे आणि जहाल राजकारणाचेप्रणेते कोणाला म्हणतात?
४) देशात किती गिरिजन जमाती आहेत?
५) महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्रापैक किती टक्के जंगलं सरकारीवनखात्याच्या ताब्यात आहेत? 
उत्तर : १) गोदावरी २) अळिंबी ३) दादाभाई नौरोजी ४) ५0 पेक्षा अधिक ५) ८0 टक्के

वाढवा सामान्य ज्ञान
१) चौथ्या पंचवार्षिक योजना काळातील पंतप्रधान कोण?
२) चंदीगडमधील प्रमुख भाषा कोणती?
३) 'थिऑसॉफिकल सोसायटी' या आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक संस्थेचं मुख्यालय कोठे आहे?
४) बल्लारपूर हे शहर कशासाठी ओळखलं जातं?
५) लोकांनी निवडून दिलेल्या शासनव्यवस्थेला काय म्हणतात?
उत्तरं : १) श्रीमती इंदिरा गांधी २) पंजाबी ३) चेन्नई ४) कागदाचा कारखाना ५) लोकशाही

वाढवा सामान्य ज्ञान
१) इराणची राजधानी कोणती?
२) भारतात पहिली शिरगणती झाली तेव्हा व्हॉइसराय कोण होते?
३) ढाका-कोलकाता बस पर्व कधी सुरू झालं?
४) मद्रास महाजन सभेचे संस्थापक कोण?
५) स्वत्झर्लंडच्या विमान वाहतुकीचे नाव काय?
उत्तर : १) तेहरान २) लॉर्ड मेयो ३) १९ जून १९९९
४) सुब्रमण्यम अय्यर ५) स्वस्सा

 वाढवा सामान्य ज्ञान
१) जॉर्जिया या देशात कोणती शासन पद्धती अस्तित्वात आहे?
२) महाराष्ट्रातील मांजरा नामक नदी कोणत्या डोंगरात उगम पावते?
३) जपानमधील चिरनिद्रिस्त ज्वालामुखी कोणता?
४) सूर्याभोवती लंबगोलाकार मार्गाने फिरणार्‍या आकाशस्थ गोलांना काय म्हणतात?
५) कोलोसियम हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ कोठे आहे?
उत्तर : १) अध्यक्षीय शासन पद्धती २) बालाघाट
३) फुजियामा ४) ग्रह ५) रोम

वाढवा सामान्य ज्ञान
१) पारादीप बंदर कोठे आहे?
२) राज्यसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात आहेत?
३) कंबोडियाची राजधानी कोणती?
४) राष्ट्रपती कोणत्या कलमाद्वारे वटहुकूम काढतात?
५) 'कोलाज' या पुस्तकाच्या लेखिका कोण?
उत्तर : १) ओरिसा २) उत्तर प्रदेश ३) नॉमपेन्ह ४) कलम १२३ ५) कवयित्री शिरीष पै

No comments:

Post a Comment