Wednesday 22 April 2020

अंदमान-निकोबार सहल

अंदमानची सहल सुरू होते ती पोर्टब्लेअर शहर दर्शनापासून. या सफरीतील प्रमुख आकर्षण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावकरकरांसह देशातल्या अनेक क्रांतिकारकांच्या स्मृती जागवणारा सेल्युलर जेल. हा तुरुंग दोनदा पाहावा लागतो. एकदा दिवसाउजेडी तेथील सावकारांची कोठडी, फाशीवर,ऐतिहासिक छायाचित्रांची दालने, वस्तुसंग्रहालय . तुरुंगाची रचना अचंबित करणारी आहे. सायंकाळी साडेपाच वाजता सुरू होणारा लाइट अँड साऊंड शोचा अदभूत अनुभव पाहायला मिळतो. या स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. सावकारांच्या जाज्ज्वल्य देशभक्तीची गाथा ऐकताना प्रत्येक मराठी माणूस

 निःशब्द होऊन या स्वातंत्र्यवीरासामोर नतमस्तक होतो.
या शिवाय या शहरात सागरिका म्युझियम, आशियातील सर्वात मोठी ब्रिटिशकालीन चाथ सॉ मिल, मिनी झू, अंदमान-निकोबारमधील मूळ आदिवासींची जवळून ओळख करून देणारे अर्थापॉलिजीकल म्युझियम  तसेच मत्स्यालय, गांधी मैदान पाहण्यासारखे आहे. अंदमान द्वीप समूहामध्ये एकूण 572 लहान-मोठ्या बेटांचा समावेश आहे. त्यातील केवळ 38 बेटांवरच मानवी वस्ती आहे. मानवी वास्तव्य असलेल्या बेटांपैकी अंदमानमध्ये 26 आणि निकोबार मध्ये12 बेटांचा समावेश होतो. निकोबारला  देशाच्या संरक्षण विषयक गोष्टींचे केंद्र असल्याने तेथे खास परवानगी शिवाय प्रवेश दिला जात नाही. ग्रेट अंदमानी,ओंगी, जारवा, सेंटीनली, शोन्पेन आणि निकोबारी या तिथल्या मूळ आदिवासी जाती. कालौघात आता यातील फक्त दोन तीन जमातीच तेवढ्या अस्तित्वात आहेत.
अंदमानमधील प्रत्येक बेटाचे आपले असे खास वैशिष्ट्य आहे. ट्रॅव्हल्स कंपन्यांची एकेका दिवसांत पाहता येथील अशा बेटांची टूर पॅकेजेस असतात. प्रत्येक बेटावर जाण्यासाठी वेगवेगळ्या जेट्टीवरून बोटी सुटतात.पोर्टब्लेअरपासून सर्वात जवळ असलेले रोझ आयलंड हे बेट ही ब्रिटिशांची जुनी राजधानी. अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी क्लब ते चर्च आणि बेकरी ते जल शुद्धीकरण संयंत्रे,पोहण्याचा तलाव, बाग-बगीचा इत्यादी सर्व सोयीसुविधा इथे उपलब्ध आहेत. राजधानी म्हटल्यावर म्हटल्यावर इथे काय काय लागतं, हे ब्रिटिशांनी दाखवून दिलं होतं.जुन्या वैभवाच्या भग्न खुणा आजही पाहायला मिळतात.
कोरलचे (प्रवाळ) खरे विश्व वंडूर बीचभोवती पाहायला मिळते. पोर्टब्लेअर ते वंडूर हा एक तासाचा रस्ता आहे. प्रवाळ बेटावर पोहोचण्यासाठी पुन्हा तासाभराचा बोटीचा प्रवास करावा लागतो. निरनिराळ्या बेटांतून मार्ग काढत जाणारी ही समुद्री सफर स्वर्गीय आनंद देणारी असते. फायबर ग्लासचा तळ असलेल्या छोट्या नावेतून आपल्याला समुद्र तळाचे कोरल -विश्व दाखवले जाते. इथले कोरल विश्व अप्रतिम आहे. आशिया खंडातील नावाजलेल्या समुद्र किणाऱयांत ज्याची गणना होते तो हॉव्हलॉक बीच असाच नितांतसुंदर आहे .

No comments:

Post a Comment