Sunday 26 April 2020

माहिती जाणून घ्या

आपली सूर्यमाला कशी आहे?
सूर्य आणि त्या भोवती फिरणारे बुद्ध, शुक्र, पृथ्वी, गुरू, शनी, नेपच्यून आणि युरेनस यांसारखे ग्रह आणि ग्रहांभोवती फिरणारे उपग्रह या सर्वांची  मिळून सूर्यमाला तयार होते. त्याचप्रमाणे धूमकेतू, अस्टेरॉइड, धूळ आणि विद्युत भरीत धूळ यांचाही सूर्यमालेत  समावेश होतो. प्लूटोही सूर्यमालेचाच  भाग आहे.


आपली आकाशगंगा कोणत्या आकाराची आहे?
आपल्या अकाशगंगेत सूर्यमालेबरोबरच इतर अब्जावधी तारयांचा समावेश आहे. त्याच प्रमाणे धूलिकण  अणि वायूंचे  प्रचंड ढग यामध्ये आहेत. अकाशगंगेचा आकार हा पातळ  तबकडीप्रमाणे असून तिचा
मध्यभाग फुगीर आहे. तिचे वर्गीकरण स्पायरल आकाराच्या तारा मंडळामध्ये केले जाते.

मोबाईल कॉम्प्युटरजवळ नेला, की कॉम्प्युटरमधून सूक्ष्म आवाज
का येतो?
मोबाईलचे कार्य हे विद्युतचुंबकीय लहरीच्या साहाय्याने चालते. मोबाईलकडून येगारे ध्वनिसदेश या लहरीमार्फत येतात. कॉम्प्युटरची ध्वनिक्षेपक यंत्रणा हे संदेश पकडते. त्यामुळे मोबाईल जवळ
नेला, की कॉम्प्युटरमथून सूक्ष्म आवाज येतो.

कॅलरीज कशा मोजल्या जातात?
एकाद्या पदार्थाच्या ज्वलनामधून उष्णता  मिळते, याचे मापन
करण्यासाठी कॅलरी हे परिमाण वापरतात. एक ग्रॅम पाण्याचे तापमान
एक डिग्री सेंटिग्रेडने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे एक कॅलरी. अन्न पदार्थापासून मिळणाऱ्या (ऊर्जा) उष्णतेच्या बाबतीत मात्र एक हजार कॅलरींना (किलो कॅलरी) कॅलरी संबोधले जाते.

No comments:

Post a Comment