Thursday 9 April 2020

प्राचीन अक्याब बंदर

बंगालच्या उपसागरातील एक महत्त्वाचे बंदर म्हणजे अक्याब होय . म्यानमार ( पूर्वीचा बहादेश ) देशातील आराकान विभागाचेव अक्याब जिल्ह्याचे हे महत्त्वपूर्णव प्रमुख शहर आहे . कलादन , मायूवलेमरो या तीन नद्यांच्या त्रिभूज प्रदेशातील कलदन नदीच्या बेटावर हे शहर वसलेले आहे . हे शहर ब्रिटिशांच्या ताब्यात असताना तेतांदूळ नियांतीचे मुख्य केंद्र होते . नतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते जपानच्या ताब्यात गेले . म्यानमार मधील इतर सर्व प्रमुख शहरांशी हे वायूमार्ग व जलमार्गाने जोडलेले आहे .
या शहराच्या मागे आराकानयोमा या नावाचा उंच पर्वत असल्यामुळे रेल्वे वा रस्त्याद्वारे हे शहर इतर शहरांशी नीट जोडता येत नाही . येथिल प्रमुख धर्म बौद्ध असून मुस्लिम व हिंदू धर्मिय लोकही येथे आहेत . मंडालेच्या दक्षिण - पश्चिम भागातील महामुनी हे भव्य बौद्ध मंदिर प्रसिद्ध आहे . इ . स . पूर्व ५५४ मध्ये आराकान प्रदेशातील धन्यवादी या शहरास म . गौतम बुद्धांनी भेट दिली होती . राजा संदा थुरीया याने म . गौतम बुद्धास विनंती केली की त्यांच्या प्रतिमेची मूर्ती तयार करण्याची परवानगी द्यावी . नंतर धातूत ही मूर्ती घडविण्यात आली बुद्धांनी त्या मूर्तीवर आपल्या उच्छ्वास सोडला . जगात पाच मूर्ती अशा आहेत ज्या बुद्धांच्या मूळ प्रतिमा मानल्या जातात त्यापैकी ही महामुनीची मूर्ती होय .

No comments:

Post a Comment