Saturday 11 April 2020

वाढवा आपले सामान्य ज्ञान


वाढवा सामान्य ज्ञान
१) आयआयटीमध्ये मुलींच्या राखीव जागांची शिफारस कोणत्या समितीने केली आहे?
२) 'हंग्री स्टोन्स' या पुस्तकाचे लेखक कोण?
३) बिरसा मुंडा विमानतळ कोणत्या शहरात आहे?
४) २0१८ च्या जागतिक हँडवॉशिंग दिनाची संकल्पना
काय होती?
५) लॉन टेनिसच्या नेटची उंची किती असते?
उत्तर : १) टिमोथी गोन्साल्विस समिती २) रवींद्रनाथ टागोर ३) रांची ४) तुमचे हात, तुमचे भविष्य ५) तीन फूट दोन इंच
वाढवा सामान्य ज्ञान
१) भारतातील सर्वाधिक ज्यूट उत्पादक राज्य कोणतं?
२) 'भारतात क्रांती होत आहे, आपल्याला लवकर गेलं पाहिजे,'  हे विधान कोणाचं?
३) जगातले सर्वात जुने सरोवर कोणते?
४) दुधाच्या गोड चवीस कारणीभूत घटक कोणता?
५) मनुस्मृती कशाशी संबंधित आहे?
उत्तर : १) पश्‍चिम बंगाल २) लॉर्ड वेवेल ३) बैकाल सरोवर ४) लेक्टोस ५) समाजव्यवस्थेशी
वाढवा सामान्य ज्ञान
१) भारत आणि पाकमधली ग्लेशिअर सीमा कोणती?
२) 'शारदा अँक्ट' कशासंदर्भात आहे?
३) 'साखरचा बाऊल' ही कोणत्या देशाची ओळख आहे?
४) ऑस्ट्रेलियाचा शोध कोणी लावला?
५) 'युएनओ' चे विस्तारित रूप काय?
उत्तर : १) सियाचिन २) बालविवाह रोखण्याच्या संदर्भात ३) क्यूबा ४) जेम्स कूक ५) युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन
वाढवा सामान्य ज्ञान
१) भारतामध्ये प्रथम महिला विश्‍वविद्यालयाची स्थापना  कधी झाली?
२) सर्वात कमी लोकसंख्या असणारं राज्य कोणतं?
३) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रथम अध्यक्ष कोण?
४) आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली
भारतीय महिला कोण?
५) भारतातले सर्वात प्राचीन लिपी कोणती?
उत्तर : १) १९१६ २) सिक्कीम ३) उमेश चंद्र बॅनर्जी
४) कमलजीत संधू ५) ब्राम्ही

No comments:

Post a Comment