Saturday 4 April 2020

नारायणराव व्यास

नारायणराव व्यास हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक होते. ते ग्वाल्हेर घराण्याच्या शैलीत गायन करत असत. ते पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य होते. ख्याल, भजन व ठुमरी गायनासाठी ते विशेष प्रसिद्ध होते. नारायणराव व्यासांचा जन्म इ.स. १९0२ मध्ये महाराष्ट्रात कोल्हापूर येथे संगीत उपासकांच्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील, काका हे कोल्हापुरात संगीत क्षेत्रात नाव कमावून होते. विख्यात संगीतकार व गायक शंकरराव व्यास हे नारायणरावांचे वडील बंधू होत. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी लाहोर येथे विष्णू दिगंबर पलुसकर यांनी सुरू केलेल्या गंधर्व महाविद्यालयात ह्यगुरुकुल पद्धतीत संगीत शिक्षण घेण्यास सुरुवात केली.
तिथे त्यांचे थोरले बंधूही संगीत शिकत होते. इ.स. १९२२ मध्ये आपले संगीत शिक्षण संपवून दोन्ही बंधू अमदावाद येथे गंधर्व महाविद्यालयाच्या स्थानिक शाखेत संगीत शिकवू लागले. इ.स. १९३७ मध्ये नारायणराव आपले थोरले बंधू शंकरराव यांच्यासमवेत मुंबईला आले व दादर येथे त्यांनी ह्यव्यास संगीत विद्यालय नावाने संगीत शिक्षण संस्था सुरु केली. नारायणरावांच्या थोरल्या बंधूंनी संगीत दिग्दर्शक म्हणून तेव्हाच्या चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. परंतु नारायणरावांनी तो मार्ग चोखाळला नाही. त्यांनी संगीत अध्यापन व गायकी कायम ठेवली. ते आकाशवाणीवरही गायचे. त्यांनी भारतातील अनेक संगीत मैफिली, महोत्सव आपल्या गायनाने गाजवले. कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांनी भारतात खूप दौरे केले. रसिक र्शोत्यांना त्यांचे गाणे प्रचंड आवडत असे. त्यांच्या काळातील ते एक लोकप्रिय गायक होते. त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन मुंबई येथील ग्रामोफोन कंपनीने (एच. एम. व्ही.) त्यांना इ.स. १९२९ मध्ये ध्वनिमुद्रणासाठी बोलावले. इ.स. १९२९ ते १९५५ ह्या काळात त्यांनी ७८ आर.पी.एम. च्या १५0 ध्वनिमुद्रिकांमध्ये साधारण प्रत्येकी तीन ते साडे-तीन मिनिटांचा कालावधी असलेली ३00 गाणी गायली. ही गाणी हिंदी भाषा, मराठी व गुजराती भाषांतील होती. नारायणरावांनी त्यांत हिंदुस्तानी रागांवर आधारित व वडील बंधू शंकररावांनी रचलेल्या मराठी बंदिशी आणि भजने गायली. त्यांच्या ध्वनिमुद्रिकांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांचे व एच. एम. व्ही. कंपनीचे नाव सर्वदूर झाले. ठिकठिकाणच्या ध्वनिमुद्रिका वितरकांनी आपल्याकडील सूचीपत्रकांवर नारायणरावांचे फोटो छापले. त्यांना 'तान कप्तान', 'संगीत प्रवीण', 'आधुनिक तानसेन' अशा पदव्या देऊन लोकांनी त्यांचे सत्कार केले. वृद्ध वयातही नारायणराव व्यास संगीत क्षेत्रात कार्यरत राहिले.इ.स. १९८४ मध्ये त्यांचे निधन झाले.

No comments:

Post a Comment