Thursday 15 October 2020

समतावादी संत रोहिदास

जातीवादी, विषमतावादी, अमानवी, अविचारी, अंधश्रध्दाळू तसेच वर्गद्वेश, वर्णद्वेष मानणाऱ्या भारतीय समाजात माघ पौर्णिमा शके १४३३ रोजी रविवारी अस्पृश्य गणल्या गेलेल्या चांभार समाजात संत रविदास यांचा जन्म झाला.उच्च - नीचतेच्या नावाखाली होणाऱ्या त्रासाला आपला समाज हा त्रासाला होता. ब्राम्हणांनी लादून दिलेल्या प्रथा यांनी सामाज्याची दैना झाली होती.

आणि अशा परिस्थितीत क्रांतिकारी संत रोहिदास यांनी त्यांच्या दोह्यांमार्फात आणि विचाराने

ब्राम्हणी व्यवस्थेवर प्रहार केला होता. जसे कि,

एकै माटी के सभी भांडे , क्या शुद्र क्या पांडे ....!

अर्थ- गुरु रोहिदास उच्चवर्णिय पंड्याना म्हणतात कि, अरे माणसा शुद्र आणि पंडित या दोघांमध्ये काहीच अंतर नाही आहे . कारण आपण सर्वच एकाच मातीचे सर्व भांडे आहोत . आपण सर्वांनी मातेच्या पोटीच जन्म घेतला आहे . दोघांचे शरीरही रक्ता मासाचे बनले आहे. मग या मध्ये शुद्र आणि पांडे कुठून झालो.

बता रे पंडित ज्ञानी कोन चाम से न्यारा, चाम का ब्रम्हा ....

चाम का विष्णु चाम का सकल पसारा ...

चाम का अम्बर, चाम की धरणी चाम का है जग सारा ...

छम का योगी चाम का भोगी , चाम का गुरु तुम्हारा ...

जहाँ वहाँ चाम ही चाम, चाम के मंदिर बोलत राम ...

चाम की गऊ चाम का बाछडा, चाम ही धुन ? छम ही ठांडा ...

चाम का हाती , चाम का रजा , चाम के उंट पर चाम का बाजा ...

कतह " रविदास" सुनो रे पंडित ज्ञानी चाम का गुरु नहीं हमारा ...

चाम बिना देह किसकी बनाई ...?

अर्थ- गुरु रोहिदास म्हणतात, सर्वच मानव जात, पशु, प्राणी , वादय येव्हडच नाही तर हे या सर्व जगात सर्वत्र चामड पसरल आहे … मग पंडित सांग चामड्याशिवाय देह कोणाच बर बनवलं आहे ? 

चाम के हम भी , चाम के तुम भी ….!

चामका है जग सारा , चाम बिगर कऊन जीव ही …!!

कहे रविदास चमारा …!!!

अर्थ- गुरु रोहिदास म्हणतात की , अरे मुर्ख मनसा चामड्याचा संबंध चांभार जातीशीच नाही आहे. जगातल्या प्रत्येक जीवाचा चामाड्याशी संबंध असून सर्व जगच चामड्याने व्यापले आहे .)

त्यांनी अस्पृशते विषयी बंड पुकारून आपल्या समाजासाठी प्रबोधनाचे काम केल.

आणि म्हनुनच ब्राम्हणांनी त्यांची संस्कृती वाचवण्यासाठी क्रांतिकारी रविदास महाराज यांना चमत्कारी घोषित करून टाकले. आणि त्यांच्या क्रांतीकारी व विज्ञानवादी विचारांना दाबण्याचा प्रयत्न केला. जसे कि कटौती मधुन सोन्याचे कंगन निघाले, त्यांनी त्यांचे शरीर चिरून जान्हवे दाखवले इत्यादी.

संत रविदास महाराज त्यांच्या दोह्यामार्फत बोलतात कि ,

ऐसा चांहू राज में जहां मिलै सबन को अन्न ...!

छोटो बड़ो सब सम बसै 'रविदास' रहे प्रसन्न ...!!

अर्थ- संत रोहिदास म्हणतात कि, मला समाज्यामध्ये अशी शाशनव्यवस्था हवि आहे जिथे सर्वाना अन्न मिळेल. कोणीही उपाशी राहणार नाही. आणि जिथे लहान-थोर, उच्च-निच, स्पृश्य-अस्पृश्य, सवर्ण - दलित अशी कोणतीही तुच्छ भावना कोणाच्या मनात राहणार नाही. यातच रोहिदास प्रसन्न राहतील.

वरील दोह्यावरून आपल्याला समजून कि संत रोहिदास हे फक्त चांभारांचेच गुरु मार्गदर्शक हितदक्षक महापुरुष नसून ते सर्व बहुजन सामाज्याचे हितचिंतक होते.

No comments:

Post a Comment