Friday 28 September 2018

भगतसिंह

भगत सिंग महान क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म १९0७ साली तत्कालीन पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बंगा गावात झाला. ९ सप्टेंबर १९२५ रोजी भगतसिंगांच्या पुढाकाराने व आग्रहाने क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेचे नाव हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असे ठेवण्यात आले. असोसिएशनचे कार्य समाजप्रबोधन, माहितीपत्रके, साहित्य सामुग्रीची जमवाजमव, भूमिगतांना आर्शय देणे होते. हुतात्मा चंद्रशेखर आझाद हे मुख्य समन्वयक व सेनेचे मुख्य सेनापती तर भगतसिंग यांच्यावर संघटनेचे समन्वयक व दोहोंचे सदस्य व नियंत्रक अशी कामगिरी सोपविली गेली. डिसेंबर १९२८ मध्ये, भगत सिंग आणि त्याचे सहकारी, शिवराम राजगुरू यांनी २१ वर्षीय ब्रिटिश पोलिस अधिकारी जॉन साँडर्सला लाहोर, ब्रिटिश भारत येथे गोळ्या घालून ठार मारले. जेम्स स्कॉटला ठार मारण्याचा हेतू असताना चुकून साँडर्स बळी पडला. पोलिस अधीक्षक जेम्स स्कॉट याने हिंदुस्थानातील लोकप्रिय राष्ट्रवादी नेते लाला लजपत राय यांच्यावर लाठीचार्जचा आदेश दिल्याने यात त्यांचा मृत्यू झाला.याचा बदला म्हणून भगतसिंगांनी स्कॉटला मारण्याचा बेत केला होता. या कटात चंद्रशेखर आझाद व राजगुरू सहभागी होते. त्यानंतर भगतसिंग व राजगुरू यांचा शोध घेत असल्याचे पाहून चंद्रशेखर आझाद यांनी चानन सिंघ नावाच्या भारतीय पोलिस अधिकार्‍याला मारले.

No comments:

Post a Comment