Friday 28 September 2018

आजच्या काही ठळक बातम्या

1)राम-लक्ष्मण यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार- संगीत क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ राम-लक्ष्मण यांना यंदाचा 'लता मंगेशकर पुरस्कार' जाहीर झाला आहे.
५ लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  राम-लक्ष्मण यांनी मराठीसह हिंदीतही आपल्या संगीताची वेगळी छाप सोडली आहे. त्यांनी मराठीत 'पांडू हवालदार' या सिनेमापासून संगीत द्यायला सुरुवात केली होती. १९७६ पर्यंत राम कदम व विजय पाटील ही जोडी 'राम-लक्ष्मण' या नावाने संगीत द्यायचे. १९७७ मध्ये राम कदम यांचे निधन झाल्यानंतरही विजय पाटील यांनी 'राम-लक्ष्मण' या नावानेच संगीत देणे सुरू ठेवले. 'हम से बढकर कौन' चित्रपटातले 'देवा हो देवा गणपती देवा' या गाण्याने त्यांना प्रसिद्धी मिळाली. राम-लक्ष्मण यांनी देवानंद, मनमोहन देसाई, महेश भट्ट, दादा कोंडके यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर काम केले आहे. 'मैने प्यार किया' या सिनेमातील उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाबद्दल त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी पत्थर के फूल, सातवा आसमान, हम आपके है कौन, हम साथ साथ है आदी सिनेमांना संगीत दिले होते. त्यांनी आजवर ७५ हिंदी, मराठी आणि भोजपुरी सिनेमांना संगीत दिले आहे. अंजनीच्या सुता तुला, खेळ कुणाला दैवाचा कळला, जीवन गाणे गातच रहावे, झाल्या तिन्ही सांजा करून, पिकलं जांभूळ तोडू नका या त्यांच्या गाण्यांनी मराठी मनावर अधिराज्य निर्माण केलेले आहे.

2)शबरीमाला मंदिरात महिलांनाही प्रवेश- केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश महिलांना प्रवेशबंदी करणे घटनाबाह्य असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने सबरीमला मंदिरात महिलांनाही पूजा करण्याचा अधिकार दिला आहे. शबरीमला हे केरळमधील प्रसिद्ध मंदिर असून या मंदिरात १0 ते ५0 वर्षांच्या महिलांना प्रवेशबंदी होती. रजोनवृत्ती झालेल्या महिलांना प्रवेश दिला जातो. याविरोधात इंडियन यंग लॉयर्स असोसिएशनने महिलांच्या प्रवेशबंदीविरोधात सुप्रीम कोर्टात २00६ मध्ये याचिका दाखल केली होती. गेल्या १२ वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित होते. अखेर शुक्रवारी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिर्शा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने निर्णय दिला. घटनापीठात न्या. आर. एफ. नरिमन, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. इंदू मल्होत्रा यांचा समावेश होता. चार विरुद्ध एक अशा फरकाने सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला.
शबरीमला हे केरळमधील प्रसिद्ध मंदिर असून या मंदिरात महिलांना प्रवेशबंदी आहे. रजोनवृत्ती झालेल्या महिलांना प्रवेश दिला जातो. इंडियन यंग लॉयर्स असोसिएशनने महिलांच्या प्रवेशबंदीविरोधात सुप्रीम कोर्टात २00६ मध्ये याचिका दाखल केली होती. गेल्या १२ वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे. नोव्हेंबर २0१६ मध्ये केरळ सरकारने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. शबरीमला मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश द्यावा, असे केरळ सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. विशेष म्हणजे डाव्या आघाडीच्या सरकारनेच २00७ साली दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात बंदीच्या सर्मथनार्थ भूमिका मांडली होती. यावरून सुप्रीम कोर्टानेही केरळ सरकारला फटकारले होते. मंदिरात प्रवेशाला आमचा पाठिंबा आहे, असे केरळ सरकारने न्यायालयात सांगितले. तुम्ही प्रतिज्ञापत्र वेळोवेळी बदलत आहात, हे योग्य नाही, असे ताशेरे सुप्रीम कोर्टाने केरळ सरकारवर ओढले.
गेल्या वर्षी १३ ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केले होते. महिलांना मंदिरात बंदी करण्याच्या मुद्द्याची कायदेशीरता तपासण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते.मंदिर व्यवस्थापनाच्या दाव्यानुसार गेल्या १५00 वर्षांपासून या मंदिरात महिलांना प्रवेशबंदी असल्याचे सांगण्यात आले. जुलै महिन्यात सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने महत्त्वपूर्ण मत मांडले होते. या मंदिरात पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही प्रार्थनेचा समान अधिकार असून तो कुठल्याही कायद्यावर अवलंबून असता कामा नये, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. तसे करण्यासाठी कुठल्याही कायद्यावर विसंबून राहण्याची गरज नाही, असे मत न्या. चंद्रचूड यांनी म्हटले होते.

3)  फिल्मफेअरमध्ये 'रिंगण'ने पटकावले पाच पुरस्कार- राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारास पात्र अशा दर्जेदार चित्रपटांची निर्मिती आणि प्रस्तुती करणार्‍या विधि कासलीवाल यांच्या लॅन्डमार्क फिल्म्सच्या शिरपेचात, आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कारण, यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात लॅन्डमार्कच्या रिंगण या सिनेमाने तब्बल पाच सर्वोत्कृष्ट पुरस्कारांवर आपले नाव कोरले. ज्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा क्रिटीक्स अवॉर्ड शशांक शेंडे यांना देण्यात आला असून, साहील जोशीला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा आणि दिग्दर्शकीय पदार्पणासाठी व कथेसाठी मकरंद माने यांना गौरविण्यात आले. तसेच आदर्श शिंदेला सर्वोत्कृष्ट पार्श्‍वगायकासाठी सन्मानित करण्यात आले.
नुकत्याच पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यातील अंतिम नामांकन यादीत लॅन्डमार्क फील्म्सला एकूण १६ नामांकने प्राप्त झाली होती. ज्यात गच्ची या सिनेमाच्या दोन नामांकनाचादेखील समावेश आहे. गच्ची सिनेमातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी प्रिया बापटला आणि सर्वोत्कृष्ट ध्वनीमुद्रणसाठी मनोज मोचेमाडकर यांना नामांकन प्राप्त झाले होते.
रिंगण सिनेमाला १४ नामांकने जाहीर झाली होती. ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी कल्याणी मुळे, सर्वोत्कृष्ट गीतलेखनासाठी दासू वैद्य आणि वैभव देशमुख, सर्वोत्कृष्ट पार्श्‍वगायकासाठी अजय गोगावले, सर्वोत्कृष्ट छायाचित्रकारासाठी अभिजित अब्दे, सर्वोत्कृष्ट संवादासाठी मकरंद माने, सर्वोत्कृष्ट पार्श्‍वसंगीतासाठी गांधार आणि सर्वोत्कृष्ट ध्वनीमुद्रणसाठी महावीर सब्बनवर यांचा समावेश होता.
अश्याप्रकारे, विविध पुरस्कार सोहळ्यात दजेर्दार कामगिरी करणार्‍या लॅन्डमार्क फिल्मच्या चित्रपटांची मालिका अशीच पुढे कायम राहणार आहे. लॅन्डमार्क संस्थेअंतर्गत सादर होणार्‍या या आशयसमृध्द चित्रपटांच्या यादीत आता नशीबवान हा सिनेमादेखील नव्याने दाखल झाला आहे. अमोल वसंत गोळे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटामध्ये भाऊ कदमची प्रमुख भूमिका असणार आहे. उदय प्रकाश लिखित दिल्ली कि दिवार कथेवर आधारित असलेला हा चित्रपट ११ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

No comments:

Post a Comment