Tuesday 25 September 2018

कमलाकर सारंग

सुप्रसिद्ध मराठी नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक कमलाकर सारंग यांचा जन्म २९ जून १९३४ रोजी झाला. चाळीस एक वर्षांपूर्वी नाटककार सुरेश खरे यांनी 'आरोप' नाटक लिहिले होते. त्यात लालन सारंग आणि जयराम हर्डीकर यांच्या भूमिका होत्या. मराठी प्रमाणे गुजराती रंगभूमीवरही याचे प्रयोग झाले. कमलाकर सारंग यांनी 'आरोप' नाटक दिमाखात रंगभूमीवर आणले होते. त्यांनी दिग्दर्शिन केलेली घरटे आमुचे छान, बेबी व जंगली कबूतर इत्यादी नाटके गाजली. मराठी नाय़अभिनेत्री लालन सारंग या यांच्या पत्नी होत. सखाराम बाइंडर इत्यादी नाटकांतील या दोघांचा अभिनय विशेष नावाजला गेला. विजय तेंडुलकर लिखित 'सखाराम बाइंडर' हे नाटक प्रचंड वादग्रस्त व वादळी ठरले. लालन सारंग यांनी 'चंपा' आणि निळू फुले यांनी 'सखाराम' या भूमिका केल्या होत्या. या नाटकाने इतिहास घडविला. या नाटकाविरुद्ध दिग्दर्शक कमलाकर सारंग यांना लढा द्यावा लागला. नाटकाविरुद्ध खटला भरला गेला. हे नाटक म्हणजे विवाह संस्था संकटात सापडण्याचे भय आहे, असा आक्षेप घेण्यात आला होता. या संदर्भात सारंग सेन्सॉर बोर्डाविरुद्ध कोर्टात गेले. सहा महिने लढल्यावर नाटक एकही कट न करता हायकोर्टातून सुटलं आणि पुन्हा दिमाखानं प्रयोग सुरू झाले. सारंगानी सखाराम बाइंडर नाटकाच्या वेळच्या आठवणींवर 'बाइंडरचे दिवस' नावाचे पुस्तक लिहिले. आजच्या दिवशी (१९९८)प्रख्यात रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते, लेखक कमलाकर सारंग यांचे निधन झाले.

No comments:

Post a Comment