Friday 28 September 2018

कविता महाजन

मृद्ध लेखणीच्या सहाय्याने आपले जगणे, अनुभव जगासमोर मांडणार्‍या मराठीतील संवेदनशील लेखिका आणि कवयित्री म्हणून, कविता महाजन यांची ओळख होती. त्यांनी आपली ओळख पुढे र्मयादीत न ठेवता आपल्या लेखणीतून त्यांनी स्त्रीयांच्या विविध प्रश्नांना नेहमीच वाचा फोडली. लेखन करत असतानाच त्यांनी समाजकार्यही तितक्याच तळमळ3ीने केले. कविता महाजन यांचा जन्म ५ सप्टेंबर १९६७ रोजी नांदेड येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयामध्ये झाले.त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यांनी मराठी साहित्य विषयात एम.ए. केले होते. भिन्न आणि कुहू या कादंबर्‍याने कविता महाजन यांना विशेष ओळख मिळाली होती.
कविता महाजन यांचे 'तुटलेले पंख','आग अजून बाकी आहे','आगीशी खेळताना','आबा गोविंदा महाजन-बालसाहित्य आकलन आणि समीक्षा','कुमारी माता'अनुवादित पुस्तक तसेच त्यांचा 'कुहू' हा लेखसंग्रहही खूप गाजला. तसेच 'ग्राफिटीकॉल', 'बकरीचं पिल्लू',' जंगल गोष्टी'पाच पुस्तकांचा संग्रह,'जोयानाचे रंग', त्पुरुष काव्यसंग्रह 'तुटलेले पंख ' भारतीय लेखिका पुस्तक मालिका, हे लेखसंग्रह गाजले. बायकांचे पाय भुतासारखे उलटे असतात. कुठेही जात असले, तरी ते घराकडेच वळतात, कविता महाजन यांच्या गाजलेल्या 'ब्र'या कादंबरीतील हे वाक्य बरंच काही सांगून जाते.२00८ मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर कवयित्री बहिणाई पुरस्कार,साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार, रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादाला २0११साली पुरस्कार मिळाला होता.२0१३ मध्ये मुख्याध्यापिका शशिकलाताई आगाशे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय बालवाड्मय पुरस्कार 'जोयनाचे रंग'या कथासंग्रहासाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कविता महाजन यांना गेल्या महिन्याभरापासून फुफ्फुसाचा त्रास जाणवत होता. काही दिवसांपासून न्यूमोनियाने आजारी असल्यामुळे त्यांना बाणेर येथील चेलाराम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीशी लढतालढता त्यांची अखेर दीपज्योत मालवली. त्यांच्या अचानक जाण्याने एक हरहुन्नरी लेखिका गमावल्याची प्रतिक्रिया साहित्य, कला, समाजविश्‍वातून येत आहे.

No comments:

Post a Comment