Saturday 22 September 2018

वीर योद्धा राव तुलाराम


९ डिसेंबर १८२५ ला हरियाणातील रेवाडी जिल्ह्य़ातील यादव राजघराण्यात राव तुलाराम यांचा जन्म झाला. वयाचे १४ वे वर्ष न संपत तर त्यांच्या वडिलांचे देहावसान झाले आणि सत्तालोलूप ब्रिटिशांना आणखी एक राज्य खालसा करण्याची आयतीच संधी मिळाली.
रेवाडीला आपल्या अधिपत्याखाली आणून तेथील जनतेकडून कर जमा करण्याचे इंग्रजांचे कुटिल मनसुबे होते. जुन्या इतिहासातील पानांतील नोंदीनुसार राव तुलाराम यांच्या पूर्वजांकडे तेव्हा ८७ गावांचे वतन होते. त्यावेळी त्याची अंदाजे किंमत २0 लाख रुपये असावी. वडिलांच्या मृ्त्यूनंतर राज्यकारभार त्यांच्या आईकडे आला असला तरी राजगादीवर राव तुलाराम यांनाच बसविल्या गेले.
राव तुलाराम यांच्या रक्तात देशभक्ती भिनली असल्यानेच इंग्रजांशी मराठय़ांच्या झालेल्या लढाईत राव तुलाराम यांनी मराठय़ांना सहाय्य केले. परिणामी इंग्रजांचा तुलाराम यांच्यावरील रोष अधिक वाढला. इंग्रजांनी याचा सूड उगवण्यासाठी राव तुलाराम यांच्या वतनदारीत कपात करीत तो सरळ एक लाखांपर्यंत आणली. पर्यायाने इंग्रजांप्रती द्वेषाची बीजे रेवाडीतील जनतेमध्ये पेरल्या गेली. याच द्वेषभावनेचे रूपांतर १८५७ च्या राष्ट्रीय उठावादरम्यान होऊन राव तुलाराम आपल्या बंधूसह इंग्रजांविरुद्ध युद्धात उतरले. जिथे चरबी लावलेले काडतूस उघडण्यास भारतीय सैनिकांनी मनाई केल्याने इंग्रज यांच्या अत्याचार करायला लागले. तिथे राव तुलाराम सारख्या योद्धांनी इंग्रजांच्या नाकात नऊ आणायला सुरवात केली. मेरठमध्ये इंग्रजांना मात देत हे वीर दिल्लीकडे कूच करते झाले. दिल्लीतील ब्रिटिशांसोबत झालेल्या युद्धात ब्रिटीश सैन्यात हाहाकार माजल्याच्या नोंदी सापडतात. यानंतर आपल्याच प्रांतात जाऊन ब्रिटीशांना हुसकावून लावले. या उद्देशाने राव तुलाराम बेचैन झाले. १७ मे १८५७ रोजी ५00 यादवांचे सैन्य घेऊन राव तुलाराम यांनी तहसील मुख्यालयावर धावा बोलला. कार्यालयातील तहसीलदार तसेच ठाणेदारास बाहेर हाकलून तेथील खजिन्यावर व कार्यालयांवर कब्जा केला. या विजयासह राव तुलाराम यांनी रेवाडी, भोरा आणि शहाजहानपूरच्या ४२१ गावात स्वत:चे अधिपत्य जाहीर केले.
इंग्लंडमध्ये ब्रिटीश हुकूमतास ही बातमी कळताच ते हैराण झाले. लगेच मोठय़ा अधिकार्‍यांना हुकूम सोडले गेले की होईल तितक्या लवकर राव तुलारामला बंदी बनवावे. अन्यथा राव तुलारामने केलेला पराक्रम संपूर्ण देशाला माहिती होईल आणि ब्रिटीश सत्तेविरुद्ध वणवा पेटायला उशीर लागणार नाही याची जाणीव ब्रिटिशांना व्हायला लागली. यानंतर लगेच दोनदा राव तुलाराम यांच्यावर हल्ला केला. परंतु राव तुलाराम समोर ब्रिटीशसैनिकांची दानादान होऊन जीव मुठीत घेऊन पळण्यावाचून ब्रिटिशांना गत्यंतर उरले नाही. परंतु ब्रिटिशांवरील हा विजयाचा अनंदाचा राव तुलाराम यांना जास्त का उपभोग घेता अला नाही. यानंतर त्यांचे प्रकृतीस्वास्थ ढासळायला लागले. यातच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वीरगतीचे वृत्त त्यांना कळले त्यानंतर त्यांना अधिकच दु:ख झाले. या धक्क्य़ातून सावरायला त्यांना वेळच मिळाला नाही आणि २३ सप्टेंबर १८६३ रोजी भारतमातेचा हा सुपुत्र वयाची अगदी चाळीशीही पूर्ण न करता काळाच्या पडद्याअड झाला.

No comments:

Post a Comment