Wednesday 26 September 2018

सलग सातव्यांदा मुकेश अंबानीच सर्वाधिक श्रीमंत


भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणार्या मुकेश अंबानी यांनी मागील वर्षभराच्या कालावधीमध्ये दिवसाला 300 कोटी कमावले आहेत. तर कंपनीचे शेअर 48 टक्क्यांनी वाढल्याने सलग सातव्या वर्षी ते देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. वित्तीय क्षेत्रातील कंपनी असणार्या ब्रिटनमधील बार्कलेज हूरून या वित्तीय क्षेत्रात कार्यरत असणार्या कंपनीने 2018 मधील भारतातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. याच यादीबरोबर जाहीर केलेल्या अहवालात त्यांनी मुकेश अंबानींच्या संपत्तीबद्दलचा तपशीलही दिला आहे. या अहवालानुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष असणार्या मुकेश अंबानींची एकूण संपत्ती 3 लाख 71 हजार कोटी इतकी आहे. एवढेच नव्हेत तर भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या या यादीमध्ये मुकेश अंबानींच्या खालोखाल असणार्या दुसर्या, तिसर्या आणि चौथ्या क्रमांकावरील व्यक्तींची संपत्ती एकत्र केली तरी ती अंबानींच्या संपत्तीपेक्षा कमीच आहे. श्रीमंत व्यक्तींच्या यादीत एस. पी. हिंदूजा आणि परिवार (1 लाख 59 हजार कोटी), एल. एन. मित्तल आणि परिवार (1 लाख 14 हजार 500 कोटी) आणि अझीम प्रेमजी (96 हजार 100 कोटी) या तीन उद्योजकांचा क्रमांक लागतो. तर मागील वर्षी दुसर्या स्थानावर असणार्या दिलीप सांघवी यांच्या संपत्तीमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे. या वर्षी सांघवी हे 89 हजार 700 कोटींच्या एकूण संपत्तीसहीत या यादीत पाचव्या स्थानी आहेत. या यादीत सहाव्या स्थानी कोटक महिंद्रा बँकचे उदय कोटक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 78 हजार 600 कोटी इतकी आहे. त्याखालोखाल सातव्या क्रमांकावर सायरस पुनावाला (73 हजार कोटी), गौतम अदानी आणि परिवार (71 हजार 200 कोटी), सायरस मिस्त्री आणि शापूर मिस्त्री हे 69 हजार 400 कोटींच्या संपत्तीसहीत संयुक्तरित्या नवव्या स्थानावर आहे.

No comments:

Post a Comment