Saturday 22 September 2018

तुम्हाला माहित आहे का?


प्रश्1: देशाचे पहिले मुख्य न्यायाशीश कोण?
उत्तर: एच. जे. कानिया देशाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते. त्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारली होती. कानिया यांनीच देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना शपथ दिली होती. 1951 मध्ये वयाच्या 61 व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते गुजरातच्या नवसारीचे राहणारे होते.
प्रश् 2: भारतीय रेल्वेचा सर्वात मोठा (लांब)मार्ग कोणता?
उत्तर: भारतीय रेल्वेचा सर्वात लांब किंवा मोठा मार्ग हा डिबूगढ ( आसाम) ते कन्याकुमारी असा आहे.हा मार्ग 4 हजार 286 किलोमीटरचा आहे. हा मार्ग पूर्ण करण्यासाठी 82 तास लागतात. विवेक एक्सप्रेस हे अंतर पूर्ण करते. हा जगातला नववा सर्वात लांब मार्ग आहे.
प्रश् 3- मोहिनी शर्मा-माने कोण आहेत?
उत्तर- मोहिनी शर्मा- माने मिसेज इंडिया वर्ल्ड 2016 च्या विजेत्या आहेत. 2016 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मिसेज वर्ल्ड-2016 मध्ये त्या स्पर्धक होत्या. त्यांनी ब्रिटनच्या मिडिलसेक्स युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून स्ट्रॅटजी एंड सोशल वेलफेयरमध्ये एमबीए केलं आहे.मुंबईमध्ये दोन प्री स्कूल चालवतात. त्याचबरोबर मुंबईबाहेरदेखील सेकेंडरी स्कूलचे संचालन करीत आहेत.या केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान आणि महिला सबलीकरण अभियानसाठीदेखील काम करतात.  महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी काम करतात. महिला समाजात पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकतील, असा प्रयत्न या माध्यमातून सुरू आहे.
प्रश् 4- टीचर्स डे (शिक्षक दिवस) चे जनक कोण?
उत्तर- भारताचे द्वितीय राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात डिचर्स डे (शिक्षक दिवस) म्हणून साजरा केला जातो. 1965 मध्ये काही विद्यार्थी राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्याकडे गेले आणि त्यांचा जन्म दिवस साजरा करण्याबाबत विचारणा केली. राधाकृष्णन म्हणाले की, त्यांच्या जन्मदिवसाच्या बदल्यात त्या दिवशी शिक्षक दिन साजरा केला तर आपल्याला फार आनंद होईल. तेव्हापासून हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो.
प्रश् 5- सर्वात छोटे (लहान) राज्य कोणते?
उत्तर- क्षेत्रफळाच्यादृष्टीने भारतातील सर्वात छोटे (लहान) राज्य आहे, ते म्हणजे गोवा. याचे एकूण क्षेत्रफळ फक्त 3 हजार 702 चौरस किलोमीटर आहे. भारत ज्यावेळेला स्वतंत्र झाला,त्यावेळेला गोव्यावर पोर्तुगीजचे राज्य होते. सन 1961 मध्ये भारताने पोर्तुगीजना हाकलून देऊन गोव्याला आपल्या हिश्शाचा भाग बनवला. तेव्हा तो केंद्रशासित प्रदेश होता. 30 मे 1987  मध्ये गोवा भारताचा 25 वा राज्य बनला. गोवा आपल्या सुंदर समुद्री किनार्यासाठी प्रसिद्ध आहे. संपूर्ण जगभरातून पर्यटक गोव्यात सुट्टी साजरी करायला येतात.



No comments:

Post a Comment