Wednesday 26 September 2018

रक्तदान

रक्तदान हे श्रेष्ठदान आहे असं आपण म्हणतो. पण हे दान करताना काही काळजीही घ्यायला हवी. रक्तदान केल्यामुळे दात्याला कोणत्याही प्रकारच्या आरोग्यविषयक अडचणींचा सामना करावा लागू नये याविषयी दक्ष रहायला हवं. त्या तत्त्वानुसारच सर्दी, पडसं, खोकला किंवा ताप यासारख्या कोणत्याही रोगजंतूंच्या उपसर्गाची लक्षणं दिसत असतील तर ती नाहशी होईपर्यंत रक्तदान करता येत नाही. त्या आजारांवरील उपचारासाठी प्रतिजैविकांसारखी काही औषधं दिली असतील तर त्यांचा परिणाम नाहिसा होईपर्यंतही रक्तदानाला मनाई करण्यात येते. बाळंत झालेल्या स्त्रीला पुढचे सहा आठवडे रक्त देता येत नाही. एखादी शस्त्रक्रिया झाली आहे, स्त्रीला पाळी आलेली आहे, ज्या व्यक्तीने पुरुष अथवा स्त्री वेश्येशी समागम केला आहे, जिचा गर्भपात झाला आहे अशांनाही काही काळापुरतं रक्तदानाच्या बंदीला सामोरं जावं लागतं. काही व्यक्तंींना तर रक्तदानापासून कायमचं दूर ठेवण्यात येतं. यात रक्तवाहीनीवाटे नशिल्या पदार्थांचं सेवन करणार्‍यांचा समावेश होतो. एड्सला कारक असणार्‍या एचआयव्ही विषाणूंची बाधा झालेली आहे, अशांचंही रक्त घेतलं जात नाही.

No comments:

Post a Comment