Saturday 22 September 2018

प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा

तनुजा मुखर्जी, पूर्वार्शमीची तनुजा सर्मथ ही अभिनेत्री तनुजा नावानेच प्रसिद्ध झाली. तिचा जन्म २३ सप्टेंबर १९४३ रोजी मुंबईत झाला. तिने हिंदी, मराठी, बंगाली भाषांमधील चित्रपटांत अभिनय केला. त्यांच्या आई शोभना सर्मथ या बोलपटांच्या प्रारंभिक काळातील हिंदी-मराठी चित्रपटांतल्या अभिनेत्री होत्या, तर काजोल व तनिशा या तिच्या दोन्ही मुलीही चित्रपटक्षेत्रातील नंतरच्या पिढीतल्या अभिनेत्री आहेत. थोरली बहीण नूतन हिच्या मुख्य नायिकेच्या भूमिकेतील पदार्पणाच्या हमारी बेटी या हिंदी चित्रपटाद्वारे १९५0 साली तनुजाने बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तरुण कलाकार म्हणून तिचे पदार्पण १९६0 साली पडद्यावर झळकलेल्या छबेली या हिंदी चित्रपटाद्वारे झाले. बहारें फिर भी आयेंगी (१९६६), ज्वेल थीफ (१९६७), अनुभव (१९७१) या चित्रपटांतील तिच्या भूमिका विशेष गाजल्या.२00८ मध्ये ह्यरॉक अँन्ड रोल फॅमिली या झी टीव्हीवरील रिअँलिटी नृत्य कार्यक्रमात मुलगी काजोल आणि जावई अजय देवगण यांच्यासोबत सह-परीक्षक म्हणून छोट्या पडद्यावर पदार्पण केले.२0१३ मध्ये नितीश भारद्वाज दिग्दर्शित ह्यपितृऋण या मराठी चित्रपटात एका प्रभावी भूमिकेत पुनरागमन केले. चित्रपटातील भूमिकेला न्याय देण्यासाठी त्यांनी केशवपन केले. चित्रपटाचे आणि त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले.

No comments:

Post a Comment