Friday 28 September 2018

अभिलाष टॉमी

भारतीय नौदलातील जिगरबाज कमांडर अभिलाष टॉमी यांनी तब्बल तीन दिवस समुद्रात भरकटले असतानाही नौकेत एकट्याने बचाव करून आपल्या धैर्याचे प्रदर्शन केले. ते सुखरुप परतल्यामुळे त्यांच्याविषयी भारतीयांना आनंद झालाय सोबतच त्यांनी घालून दिलेला आदर्श भविष्यात संघर्ष करण्यासाठी बळ देणारा ठरणार आहे. त्यांच्या बचावासाठी प्रयत्न करणारे प्रशंसेस पात्र आहे.
गोल्डन ग्लोब रेस या पृथ्वी पालथी घालणार्‍या सागरी नौकानयन स्पधेर्ला फ्रेंच किनार्‍याजवळ एक जुलैला सुरूवात झाली तेव्हा १३ देशांचे १८ खलाशी उतरले होते. भारतीय नौदलातील जिगरबाज कमांडर अभिलाष टॉमी हे त्यातले एक. मात्र, एव्हाना सात खलाशांनी या स्पधेर्तून विविध कारणांनी माघार घेतली. अभिलाष तिसर्‍या क्रमांकावरून आगेकूच करत असताना ऑस्ट्रेलियाच्या पर्थपासून १९00 सागरी मैल अंतरावर त्यांची ह्यतुरिया ही नौका पाच दिवसांपूर्वी वादळात सापडली. ताशी १३0 किलोमीटर वेगाने वारे वाहात होते. लाटांची उंची होती दहा मीटरहून जास्त. तरीही याआधी एकट्याने नॉनस्टॉप पृथ्वी प्रदक्षिणा करणार्‍या अभिलाष यांनी जिद्द सोडली नाही. पण अचानक त्यांच्या नौकेची डोलकाठी तुटली तिचा जबर फटका बसून अभिलाष जायबंदी झाले. पाठीला मार लागला. त्यातच सॅटेलाइट फोनही बंद पडला. मग टेक्स्टिंग युनिट वापरून त्यांनी या संकटाची कल्पना दिली. भराभर सगळीकडे संदेश गेला. पण प्रत्यक्ष मदत मिळेपयर्ंत अभिलाष यांनी ७२ तास जिद्दीने तग धरला. खोल समुद्रात मासेमारी करणारे ओसायरिस हे फ्रेंच जहाज अभिलाष यांच्या त्यातल्या त्यात जवळ होते. या जहाजावर अभिलाषना घेण्यात आले. तोवर, भारतीय नौदल आणि इतर देशांनी त्यांच्या मदतीसाठी मोहीम सुरू केली. याही स्थितीत अभिलाष अतुलनीय धैर्य दाखवत मी ठीक आहे, असे संदेश पाठवत राहिले. ऑस्ट्रेलियन जहाजावर उपचार होऊन ते आता एका बेटावरच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. शिडाच्या जहाजातून पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले भारतीय कॅप्टन दोंदे यांचे अभिलाष हे चेले. त्यामुळे, दोंदे यांनाही अभिलाष यांच्या जिद्दीची खात्री होती. अभिलाष यांनी सुखरुप परतावे यासाठी केलेली प्रार्थना फळास आली आहे. शिवाय या निमित्ताने भारतीय नौदलाचे जवान जिगरबाज आहेत याची खात्रीही पटली. त्यांच्या परतण्याचा प्रवास जितका थरारक आहे. तितकाच तो रंजकही आहे.

No comments:

Post a Comment