Wednesday 26 September 2018

2016 मध्ये हृदयविकाराने 1.7 दशलक्ष नागरिकांचा मृत्यू


हृदयविकाराने भारतात मृत्यू ओढवण्याचे प्रमाण आजही मोठे आहे. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजच्या अहवालानुसार, 2016 मध्ये हृदयविकाराने 1.7 दशलक्ष भारतीयांचा मृत्यू झाला आहे. जागतिक हृदय दिनाच्या (29 सप्टेंबर) निमित्ताने जागतिक आरोग्य संघटनेने हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या विकाराचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत असल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. याबाबत असलेले गैरसमज आणि भीती दूर व्हावी यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. ’माय हार्ट, फॉर युवर हार्टही यंदाच्या जागतिक हृदय दिनाची मुख्य संकल्पना आहे. त्यामुळेच हृदयविकाराच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्याच्या दृष्टीने वर्षभर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्डीओव्हस्क्यूलर डिसीज (सीव्हीडी) म्हणजेच हृदयाशी निगडीत आजार. यात हृदयविकाराचा झटका आणि मेंदूच्या रक्तवाहिन्यांसबंधी विकार हे सार्वत्रिक आढळतात. बदलती जीवनशैली, धूम्रपान, मद्यपान, अनारोग्यकारक आहार आणि शारीरिक व्यायामचा अभाव ही सीव्हीडीचे प्रमाण सार्वत्रिक होण्यामागची मुख्य कारणे आहेत.

No comments:

Post a Comment