Wednesday 26 September 2018

२0 टक्के महिलांनाही तंबाखूचे व्यसन

अनेक आजाराला आमंत्रण देणार्‍या तंबाखू सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून स्त्री पुरुष यांच्यामध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण पाहिले तर भारतात ४८ टक्के पुरुष तर २0 टक्के स्त्रिया तंबाखूचे सेवन करीत असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरुन निदर्शनास येते.  तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार, कर्करोग यासह अनेक गंभीर आजाराचे प्रमाण वाढत आहे. या पदार्थाच्या सेवनामुळे शरीरावर होणार्‍या दुष्परिणामाची माहिती शेवटच्या व्यक्तीपयर्ंत पोहचविण्यासाठी आरोग्य विभागामार्फत ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत भारतात तंबाखूचे सेवन करणारे ४८ टक्के पुरुष आहेत. यात धुम्रपान करणारे १५ टक्के, धुम्रपान आणि धुम्ररहित तंबाखूचे सेवन करणारे ५ टक्के तर धुम्ररहित तंबाखू पदार्थाचे सेवन करणारे २४ टक्के पुरुष आहेत. हे प्रमाण महिलांमध्ये कमी असले तरी चिंताजनक आहेत. धुम्रपान करणार्‍यांमध्ये महिलांचे प्रमाण १ टक्का, धुम्रपान आणि धुम्ररहित तंबाखूचे सेवन करणार्‍या महिला २ टक्के तर धुम्ररहित तंबाखू पदार्थाचे सेवन करणार्‍या महिलांचे प्रमाण १७ टक्के आहे. केसांना दुर्गंधी, तोंडाची दुगर्ंधी, तंबाखूजन्य पदार्थ सेवनामुळे दात सडतात, हिरड्यांना इजा होऊन दात निकामी होतात. त्यांची मजबुती नष्ट होते. दातांवर चॉकलेटी-पिवळे डाग पडतात, वास घेण्याची क्षमता कमी होते, चेहर्‍यावर सुरकुत्या पडतात. शरीरात अशक्तपणा जाणवतो, हाडे ठिसूळ होतात. रोगप्रतिकारक शक्यता कमी होऊ लागते. डोळ्यामध्ये जळजळ होते, डोळ्यातून पाणी येते, डोळ्याभोवती काळी वतरुळे येतात. निकोटीनच्या प्रभावामुळे मेंदूचे कार्यावर विपरित परिणाम होते. विचार करण्याची क्षमता कमी होते. चित्त एकाग्र करणे कठीण जाते. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुफ्फुस, गळा, अन्ननलिका, मूत्राशय मूत्रपिंड, नाक, पोट, गर्भाशय मुख्याचा कॅन्सर होतो. गॅगरीन, क्षयरोग, दमा, हृदयविकार, उच्च रक्तदाब, लकवा, मधूमेह, मोतीबिंदू, पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या कमी होत जाते व पुरुष नपूंसक बनतो. ज्या स्त्रिया तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करतात त्यांची प्रजनन शक्ती कमी होते. स्त्रियांमध्ये वंध्यत्व: निर्माण होते.
आरोग्यसंपन्न जीवन, शारीरिक क्षमतेत वृध्दी व वृध्दत्वाची लक्षणे कमी होतात. आत्मविश्‍वासात वाढ, व्यसन आणि उपचारावर होणार्‍या खर्चाची बचत, घरातील सदस्य आणि आजूबाजूच्या मित्रपरिवारास, पॅसिव्ह स्मोकिंगमुळे होणार्‍या आजाराचा धोका कमी होतो. आपले कुटूंब आनंदी बनते, पर्यावरण आणि राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण होते.

No comments:

Post a Comment