Saturday 23 May 2020

मजरुह सुलतानपुरी

भारतीय चित्रपटसृष्टीतील जुन्या काळातील आघाडीचे प्रमुख गीतकार मजरुह सुलतानपुरी यांचा जन्म १ आक्टोबर १९१९ रोजी झाला. आझमगड गावात एक तरुण हकिमीचा व्यवसाय करायचा. याला शायरीची मनापासून आवड. अडल्यानडल्या रुग्णांची सेवा करताना याची शायरी सुरूच असायची. याच्या शायरीच्या जादूने रुग्णाचा निम्मा आजार कमी व्हायचा. या शायरीच्या वेडातूनच हसरालूल हसन पुढे मजरुह सुलतानपुरी झाला. मजरुह म्हणजे जखमी किंवा घायाळ करणारा. मजरुहच्या गीतांनी रसिकांना प्रेमळ जखमा दिल्या. त्याच्या गीताच्या जादूने कर्णसेनांना घायाळ केले. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक ए. आर. कारदार यांनी एका मुशायर्यात हसन यांची शायरी ऐकली.
त्या वेळी ते शहाजहान चित्रपटाच्या निर्मितीत होते. त्यांनी हसन ऊर्फ मजरुह सुलतानपुरीला गीतलेखन करण्याची ऑफर दिली. मजरुह यांनी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. मजरुहने लेखणी उचलली आणि कागदावर शब्द उमटवले गम दिये मुस्तकिल, कितना नाजूक है दिल ये न जानाहाये हाये ये जालिम जमाना.शहाजहानचे संगीतकार नौशाद यांनी वाहवा केली. नौशाद यांनी त्या खुशीतच चाल बांधली. पुढे कुंदनलाल सैगल यांच्या दर्दभर्‍या आवाजाने मजरुह यांच्या शब्दाला आगळे गहिरेपण दिले. मजरुह यांच्या या पहिल्या गीतरूपी रेशमी बाणाने रसिकांना घायाळ केले. हे कमी की काय, म्हणून मजरुहने पुढील गाण्यांची सुरुवात केली, जब दिल ही टूट गया, हम जी कर क्या करे तिच्या एका नकाराने, सर्वस्व हरपल्याची भावना मजरुह यांनी अशी व्यक्त केली. सैगलच्या आवाजातला या शब्दांतला दर्द काळीज पिळवटणारा ठरला. मजरुह यांच्या घायाळ करणार्‍या कारकीर्दीचा प्रारंभच असा धडाक्यात झाला. साध्या, सोप्या परंतु काळजाला भिडणार्‍याळ शब्दांची सुरेख गुंफण ही मजरुह यांच्या लेखणीची वैशिष्ट्ये. पर्शियन शब्दांचा सर्मपक वापर त्यांनी चपखलपणे केला. याच वैशिष्ट्यांमुळे चार पिढय़ा त्यांच्या गीतांच्या चाहत्या बनल्या. मजरुह यांच्या शायराना स्वभावामुळे जवळपास सर्वच संगीतकारांबरोबर त्यांचे सुरेल नाते जमले. शहाजहानमध्ये काळीज चिरणारे वर्णन करणारी त्यांची लेखणी आरपारच्या वेळी मात्र प्रेमळ आणि हळवी झाली. तो आणि ती यांच्या नजरेच्या भाषेला, ह्यकभी आर कभी पार लागा तीर ए नजर असा रेशमी बाणाचा उपमात्मक आविष्कार झाल्यानंतर बाबूजी धीरे चलना मधून प्रेमात कशी जपून पावले टाकायची, याची एवढी मधाळ जाणीव मजरुहच देऊ जाणे. मग ओपींचे ठेकेदार संगीत आणि मजरुह यांचे शब्द यांची कानसेनांना भुरळ पाडणारी जुगलबंदी सुरू झाली. सीआयडीमध्ये याचा प्रत्यय आला. लेके पहला पहला प्यार अशी प्रेमाची ग्वाही असो, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना मधली सूचकता असो,आँखों ही आँखों में इशारा हो गया मधला जीवन जगण्याचा मार्ग असो; मजरुह यांच्या गीतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यानंतर लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या दोस्तीला मजरुह यांच्या गीतांनी जो अर्थ प्राप्त झाला, त्याला तोडच नव्हती. चाहूंगा मैं तुझे साँज सबेरे, मेरी दोस्ती मेरा प्यार राही मनवा दुख की चिंता या गाण्यांनी इतिहास रचला. त्यानंतर मजरुहची जोडी जमली ती चतुरस्र आरडी बर्मनबरोबर. ओ मेरे सोना आजा आजा मैं हूँ प्यार तेरा(तीसरी मंजिल), पिया तू अब तो आजा, चढती जवानी, कितना प्यारा वादा, दिलबर दिल से प्यारे, गोरिया कहां तेरा देस रे(कांरवा), चुरा लिया

No comments:

Post a Comment