Saturday 16 May 2020

वराह गुफा मंदिर

भगवान विष्णूच्या नऊ अवतारातील तिसरा अवतार वराह. याच वराह अवताराचे एक अतिशय सुंदर मंदिर तामिळनाडूच्या कांचीपुरम जिल्ह्यात महाबलीपुरम पासून ८ किमी अंतरावर आहे. ही गुफा मंदिर म्हणजे अखंड खडकात कोरून काढलेले मंदिर असून शिलालेख आणि ऐतिहासिक कागदपत्रांवरून ते सातव्या शतकातील आहे. १९८४ साली हे मंदिर युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सामील केले आहे.

या मंदिरातील मुख्य आकर्षण आहे ते विष्णूची वराह अवतारातील प्रतिमा. पौराणिक कथेनुसार हिरण्याक्ष राक्षसाच्या अत्याचार आणि दहशतीमुळे पृथ्वी पाण्यात बुडू लागली तेव्हा भगवान विष्णूने वराह रूप धारण करून तिला वाचविले. पल्लव राजा नरसिंह वर्मन याच्या मामल्ला नावाच्या कारागिराने खडक कापून, कोरून हे मंदिर आणि काही स्मारके साकारली. नरसिंह वर्मनचा मुलगा परमेश्‍वर यानेही हेच काम पुढे सुरु ठेवले आणि इ,स.६५0 मध्ये अनेक गुफा मंदिरे आणि रथ मंदिरे निर्माण केली.
सातव्या शतकातील या वराह गुफा मंदिरात अतिशय सुंदर नक्षीदार ख ांब असून द्रविडी वास्तू कलेचा हा उत्तम नमुना आहे. प्रवेशद्वाराच्या समोर मंदिराच्या मागच्या भिंतीवर अनेक नक्षीदार मूर्ती आहेत आणि मंदिराच्या भिंतींवरही मूर्ती कोरल्या आहेत. मंदिराच्या कडेच्या भिंतींवर विष्णू अवतारांच्या मूर्ती आहेत. हे मंदिर उंचावर असून समोर एक दगडी मंडप आहे. गुहा पश्‍चिमाभिमुख असून ३३ फुट लांब, १४ फुट रुंद आणि ११.५ फुट उंचीची आहे.

No comments:

Post a Comment