Tuesday 26 May 2020

राजकीय जागृतीचे जनक : पं. नेहरू..!

फारच थोड्या महापुरुषांच्या वाट्याला पंडित नेहरुंसारखी उत्तुंग लोकप्रियता आली. साऱ्या अशिया खंडाच्या राजकीय जागृतीचे नेहरू हे प्रतीक होऊन बसले होते. आधुनिक जगातील वैचारिक संघर्षाचे ते सुवर्णमध्य' होते. भारतीय स्वातंत्र्याच्या प्रश्नाला राष्ट्रीय पातळीवरून उचलून आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पंक्तीत बसविण्याचा चमत्कार त्यांनीच केला.
भारताची अर्थिक प्रगती झाल्यावाचून लोकशाहीच्या मार्गावर भारताची प्रगती होणे अशक्य आहे.
ह्या दृष्टीने ज्या तीन पंचवार्षिक योजना अमलात आणल्या, पंजाबात भाकरा-नानगल, ओरिसात हिराकुड, आंध्रप्रदेशात नागार्जुन सागर, प्रकल्प आणले. आणखी एक पाऊल पुढे जाऊन पंडित नेहरूंनी टाटांच्या सहकार्याने जमशेदपूर येथे पोलादाचा कारखाना, रशियाच्या साह्याने भिलाई येथे पोलादाचा कारखाना, ब्रिटनची मदत घेऊन बंगालमध्ये दुर्गापुर येथे तर जर्मनीच्या साह्याने ओरिसातील रूरकेला येथे पोलाद कारखाने स्थापित केले. त्याशिवाय शेजमीन सुपीक व्हावी व तिचा कस वाढावा यासाठी बिहारमधील सिंद्री येथे खताच्या कारखान्याला नेहरूंनी चालना दिली.
औद्योगिक व कृषीविकासासाठी धरण, पोलाद कारखाने ही भारताची आधुनिक मंदिर होत असं नेहरूंचं पुरोगामी व प्रगतीशील घोरण होतं. अशात-हेच्या विराट राष्ट्र योजना अमलात आणण्यासाठी जी दूरदृष्टी, ध्येयनिष्ठ आणि आशावाद लागतो, त्यांचा नेहरूंच्या ठिकाणी कधीच तुटवडा पडला नाही.
भारतासारख्या प्राचीन देशाला आधुनिक विज्ञानाचा दृष्टीकोन त्यांनी प्रथम दिला. बैलगाडीच्या मनोवृत्तीने आपल्याला मोटारीतून प्रवास करता येणार नाही, असे ते नेहमी म्हणत. आधुनिक काळात लढाया केवळ रणभूमीवरच लढल्या जात नसून त्या शेतामध्ये, कारखान्यामध्ये, शाळा-महाविद्यालयामध्ये लढाव्या लागतात असे ते म्हणत.
चीन आक्रमणानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल लोकांचा भ्रमनिरास झाला. काँग्रेसच्या नेतृत्वात आणि धोरणात बदल झाला पाहिजे, अशी देशामध्ये एकच हाकाटी उठली. नेहरूचे नेतृत्व संकटात आहे, असा आरडा-आरेडा सुरू झाला. काँग्रेसमधल्या पुरोगामी आणि प्रतिगामी शक्ती त्याचे खापर एकमेकांच्या डोक्यावर फोडू लागल्या. या गदारोळात भुवनेश्वर काँग्रेस अधिवेशनमध्ये नेहरूं अकस्मात आजारी
पडले. प्रकृतीत एका-एकी विघाड होऊन त्यांचे २७ मे १९६४ रोजी देहावसान झाले. स्मरणानेच माणसाच्या मरणाला खरे मोल येते स्मरणात खरोखर जग जगते।

No comments:

Post a Comment