Thursday 28 May 2020

थोरांचे सु-विचार

1)आळसावर मात करून जीवनाच्या मैदानात निश्चयाचा झेंडा जो रोवतो तोच यशस्वी होतो.-यदुनाथ थत्ते
2)इच्छाशक्ती सर्वाधिक शक्तिमान आहे,तिच्यासमोर प्रत्येक वस्तू झुकते-स्वामी विवेकानंद
3)कोणताही भार आनंदाने स्वीकारला की तो हलका होतो.-ओवीड
4)प्रसन्नता ही आत्म्याची शक्ती आहे.-सॅम्युअल स्माईल्स
5)आनंदी मनुष्य दीर्घायुष्यी असतो.-शेक्सपिअर

6) हजारो निरर्थक शब्दांच्या तुलनेत ते एक वाक्य अधिक उपयुक्त आहे, जे ऐकल्यामुळे आपल्याला मनःशांती मिळते.-गौतम बुद्ध
7)प्रसन्नता हे ईश्वराने दिलेले औषध आहे.-स्वेट गार्डन
8)दुःखाचे मंथन केल्याने आनंदरूपी अमृत प्राप्त होते.-पराशर
9)प्रसन्नता सर्व सद्गुणांची जननी आहे.-गटे
10)आनंदाचा स्रोत तर तुमच्याच जवळ आहे, त्याचा शोध घेणे व्यर्थ आहे. -स्वामी रामतीर्थ
11)क्रोधातून किंवा आळसातून नव्हे तर सतत कामात राहिल्याने जीवन सुखी बनते.-रस्किन बॉंड
12) असत्य बोलणे तलवारीने केलेल्या जखमेप्रमाणे असते.जखम भरून येते, परंतु त्याची खूण कायम राहते.-शेख सादी
13)जो मनुष्य खोटे बोलायला घाबरतो, तो इतर कशालाच घाबरत नाही.-फ्रॉइड
14)असत्य हे अपंग प्राण्यांप्रमाणे असते.ते दुसऱ्याच्या आधाराशिवाय कधीच उभे राहू शकत नाही.-थॉमस कुलर
15)एक असत्य लपवण्यासाठी दहादा खोटे बोलावे लागते. व त्यासाठी चिंता करावी लागते;तेव्हा सत्य बोलण्याची सवय ठेवा.-चाणक्य
16)आळसाने खंगून जाण्यापेक्षा श्रम करून झीजून जाणे अधिक चांगले.-एमर्सन
17)एका अहंकारी माणसाला दुसऱ्याचा अहंकार सहन होत नाही.-फ्लूकार्ट
18)तुमचा अभिमान दुसऱयांना डंख करेल, परंतु तुमचे तर अध:पतनच करेल.-कंफुशियस
19) मोठ्या माणसाच्या अभिमानापेक्षा लहान माणसाची श्रद्धा पुष्कळ काम करू शकते.-दयानंद सरस्वती
20)पुस्तकप्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत व सुखी असतो-थोरो

No comments:

Post a Comment