Tuesday 5 May 2020

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्म धरणगाव येथे १३ ऑगस्ट १८९0 ला झाला. हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते. इ.स. १९0७ मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी ठोंबर्‍यांना बालकवी ही पदवी दिली. बालकवींची कारकीर्द उणीपुरी दहा वर्षांची होती.
बालकवींच्या बहुतेक कवितांत निसर्ग मध्यवर्ती असला तरी रूढ अर्थाने निसर्गवर्णन हा त्यांच्या कवितांचा हेतू नाही. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे ते सहजोदार आहेत. निसर्गातील विविध दृश्यांत त्यांना मानवी भावना दिसतात.
म्हणजे हे निसर्गाचे मानवीकरण नाही किंवा अचेतन वस्तूवर चेतनारोप नाही. फुलराणीतील एक कलिका आणि सूर्यकिरण यांची नाजूक प्रीतिकथा ह्या दृष्टीने लक्षणीय आहे. ती जेवढी अतिमानवी तेवढीच मानवी आहे. अरुणमध्ये पहाट फुलते या घटनेभोवती कल्पनाशक्तीच्या विभ्रमांचे भान हरविणारे जाळे विणले आहे; पण त्या केवळ उत्प्रेक्षा नव्हेत. त्या घटनेत भाग घेणार्‍या निसर्गातील विविध गोष्टी तिथे सजीव होतात. इतकेच नव्हे तर कवितेच्या किमयेने रसिकही त्यांच्याशी एकरूप होतात. त्यांमागील दिव्य आणि मंगल यांच्या कवितेत अलौकिकाचा स्पर्श होतो. साध्या वर्णनात प्रतिकाची गहिरी सूचना लपलेली असते.
मर्ढेकरांच्या कवितेवर बालकवींचा मोठा प्रभाव होता. अगदी अलीकडच्या ग्रेस आणि ना. धों. महानोर यांसारख्या परस्परांहून भिन्न प्रकृतीच्या कवींच्या घडणीतही बालकवींचा प्रभाव जाणवेल.
रोमांचवादी संप्रदायाची तत्त्वे विषयांचे बंधन नको, निसर्गाचे वर्णन, अ™ोयवाद आणि गूढगुंजन, ओसाड जागेचे व रात्रीच्या भयाणपणाचे तन्मयतेने वर्णन, अतिमानुष व्यक्तींचे वर्णन, मरणाची उत्कंठा, स्वप्नाळू वृत्ती, दर्पयुक्त आशावाद, आत्मकेंद्रितता, समाजाविरुद्ध बंडखोरी, वस्तुजाताचे वर्णन करीत असताना वास्तववादाचा अवलंब न करता कल्पनावादाचा (आयडिअलिझम) अवलंब करणे. बालकवींच्या एकूण कवितेमध्ये उदासीनता व्यक्त करणार्‍या बारा-तेरा तरी कविता आहेत. कविबाळे, पाखरास, दुबळे तारू, यमाचे दूत, निराशा, पारवा, शून्य मनाचा घुमट, काळाचे लेख, खेड्यातील रात्र, संशय, हृदयाची गुंतागुंत, जिज्ञासू, बालविहग ह्या कविता त्यांपैकीच होत.
जोपयर्ंत बालकवींची तंद्री आनंदी होती तोपयर्ंत त्यांची कविता म्हणजे अलवार कोवळे अंग, जशी काय फुलांची मूस होती, पण जेव्हा ही तंद्री कोळपल्यासारखी झाली तेव्हा त्यांची कविता उदासीनताच झाली. शून्य मनाच्या घुमटात दिव्यरूपिणी सृष्टी भीषण रूप धारण करू लागली. काळाच्या भोवर्‍यात पडून जीवित केवळ करुणासंकुल झाले, मनाचा पारवा खिन्न नीरस एकांतगीत गाऊ लागला. अस्मान धरणीला मिळून रात्रिचा अवकाळ प्रहर घोरपणे घुमायला लागला. भरले घर ओके मायेच्या हलकल्लोळात मायेच्या हिरव्या राव्याला दुखवून जडता पसरलेला जीव देहाचे पंजर टाकून उडून गेला. यमाचे दूत बोलावू लागले. बालकवीचे निधन ५ मे १९१८ रोजी झाले.

No comments:

Post a Comment