Tuesday 12 May 2020

नाइटिंगेल फ्लॉरेन्स

नाइटिंगेल फ्लॉरेन्स यांचा जन्म १२ मे १८२0 रोजी झाला. फ्लॉरेन्स नाइटिंगेल या इंग्रज परिचारिका आणि आधुनिक रुग्ण परिचर्या शास्त्राच्या (शुर्शूषा) संस्थापिका होत. त्यांनी सार्वजनिक आरोग्य विज्ञानात मोलाची भर घातली. तसेच त्यांनी समाज सुधारणेसाठी संख्याशास्त्राचा (सांख्यिकी) वापर करण्याचे विशेष कार्य केले. त्यात स्वत: काढलेल्या रंगीत रोझ रेखाकृती किंवा तक्ते यांद्वारे त्यांनी संख्याशास्त्रीय आधारसामग्रीचे आलेखीय निदर्शन केले.

नाइटिंगेल यांचा जन्म इटलीतील फ्लॉरेन्स येथे झाला. त्या घरीच शिकल्या. ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, र्जमन व इटालियन या भाषांशिवाय त्यांना त्यांच्या वडिलांनी इतिहास, तत्त्वज्ञान, गणित हे विषय शिकवले. पुढे आयुष्यभर त्यांनी विविध भाषांचा अभ्यास चालू ठेवला. रुग्णालयात जाऊन रुग्णपरिचर्या शिकावी या त्यांच्या इच्छेला तीव्र विरोध झाला व संसदेच्या कामकाजाचे वृत्तांत अभ्यासावेत असे सुचवण्यात आले. तथापि, पुढील तीन वर्षांत त्या सार्वजनिक आरोग्य व रुग्णालये या विषयातील तज्ञ म्हणून गणल्या जाऊ लागल्या. १८५0 साली कैसरव्हर्ट (र्जमनी) येथील एका संस्थेत दाखल होऊन त्यांनी रुग्णपरिचर्यर्ा विषयक संपूर्ण शिक्षणक्रम पार पाडला. १८५३ मध्ये लंडनच्या इन्स्टिट्यूशन फॉर द केअर ऑफ सिक जंटलविमेन इन डीस्ट्रेस्ड सरकमस्टन्सेस या छोट्या रुग्णालयात त्या अधीक्षक म्हणून रुजू झाल्या.
रशियाविरूध्द ब्रिटन, फ्रान्स, सार्डेनिया व तुर्कस्तान या देशांबरोबर क्रिमिया येथे १८५४ मध्ये युध्द सुरू झाले. तेव्हा ब्रिटिश मंत्रिमंडळातील युद्ध सचिव सिडनी हर्बर्ट यांनी नाइटिंगेल यांच्या कार्याचे महत्त्व ओळखून त्यांना युद्धभूमीकडे जाण्याचे सुचविले. तुर्कस्तानातील सर्व सैनिकी रुग्णालयातील रुग्णपरीचर्या विषयक व्यवस्थेची जबाबदारी नाइटिंगेल यांच्यावर सिडनी हर्बर्ट यांनी सोपवली व ती त्यांनी चोखपणे पार पाडली.
१८५५ साली स्कूटारी (आताचे ऊस्कूदार) रुग्णालयात पटकी व प्रलापक सन्निपात ज्वर (टायफस ज्वर) यांची मोठी साथ उद्भवली होती ती त्यांनी नाना प्रयत्न करून आटोक्यात आणली. त्यांनी ब्रिटिश सैनिकांचे आरोग्य, निवारा व अन्न यांत सुधारणा घडवून आणण्यासाठी अविरत पर्शिम घेतले. परदेशी शासन यंत्रणाही याबाबतीत त्यांचा सल्ला घेत असत. ब्रिटिश जनतेने उभारलेल्या नाइटिंगेल निधीतून सेंट टॉमस रुग्णालयात नाइटिंगेल स्कूल फॉर नर्सेस ही स्त्रियांना रुग्णपरिचर्याविषयक शिक्षण देणारी जगातली पहिली संस्था स्थापन झाली.
नाइटिंगेल यांना संख्याशास्त्राची गोडी होती व त्याचा त्यांनी आपल्या कार्यासाठी उपयोगही केला. विविध प्रकारची आकडेवारी गोळा करून त्यातून अर्थ काढण्यात त्यांना बालपणापासून रस होता. मात्र तेव्हा ब्रिटनमध्ये महिलांना महाविद्यालयात प्रवेश दिला जात नसे. मात्र त्यांनी स्वत:च अभ्यास करून संख्याशास्त्रात प्राविण्य संपादन केले व लोककल्याणासाठी त्याचा भरपूर उपयोगही केला. त्यामुळे त्या वैद्यकिय संख्याशास्त्राच्या संस्थापिका मानल्या जातात. १८६0 मध्ये त्यांनी लंडनमध्ये सर्वात पहिली निधर्मीय नाइटिंगेल शुर्शुषा शाळा स्थापन केली.
१८५६ मध्ये, क्रिमियन युद्ध संपल्यावर युद्धात जखमी झालेल्या आणि मृत्यू पावलेल्या सैनिकांचा अहवाल त्यांनी ब्रिटिश लष्करी कमिशनकडे सुपूर्द केला. त्यात त्यांनी स्वत: काढलेल्या ध्रुवीय क्षेत्राच्या रंगीत रेखाकृती (पोलर एरिया डायग्राम) म्हणजेच रोझ तक्ते होते. त्या रेखाकृती पोचे पडलेल्या पात्राप्रमाणे ओबडधोबड दिसत होत्या, मात्र त्यामध्ये वतरुळाचे भाग करून प्रत्येक भागात वर्षाचा एक विशिष्ट कालावधी दाखविला होता. लष्करी रुग्णालयातील मृत्युदराची हंगामी कारणे प्रदर्शित करण्यासाठीही त्यांनी त्या रोझ रेखाकृती काढल्या. त्या काळी ही पद्धत अतिशय नवीन होती. संख्याशास्त्रीय आधारसामग्रीचे आलेखीय प्रदर्शन त्यांनी याप्रकारे प्रसिद्ध केले. म्हणून संख्याशास्त्राचे आलेखीय प्रतिनिधित्व करणार्‍या त्या एक पथदर्शक मानल्या जातात. ही रेखाकृती आधुनिक वृत्तीय आयताकृतीचे (सक्यरुलर हिस्टोग्राम) किंवा (पाय डायग्राम) पूर्वरूप आहे.

No comments:

Post a Comment