Wednesday 6 May 2020

रवींद्रनाथ टागोर

रवींद्रनाथ ठाकूर याचां जन्म ७ मे इ.स. १८६१ रोजी झाला. ज्यांना गुरुदेव असेही संबोधले जाते, हे एक ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २0 व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियातील पहिले नोबेलविजेते होते. कोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवींद्रनाथांनी वयाच्या ८व्या वर्षी पहिली कविता लिहिली. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने बर्‍याचशा कविता लिहिल्या. शांतिनिकेतनाची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवींद्रसंगीताचे सृजन हे रवींद्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होय.
रवींद्रनाथांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवींद्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत. पारंपरिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला. कोलकात्याच्या जोराशंका ठाकूर बाडी येथे रवींद्रनाथ टागोर (टोपणनाव रवी) यांचा जन्म झाला. वडील देवेन्द्रनाथ टागोर व आई शारदा देवी यांच्या १४ अपत्यांमध्ये रवींद्रनाथ हे १३वे होत. ११व्या वर्षी मुंज झाल्यावर रवींद्रनाथांनी वडिलांसोबत १४ फेब्रुवारी १८७३ रोजी भारतभ्रमणार्थ कलकत्ता सोडले. या भ्रमंतीत त्यांनी विविध ठिकाणे पाहिली. वडिलांची शांतिनिकेतन येथील मालमत्ता (येथे आता आजचे विश्‍वभारती विद्यापीठ आहे), अमृतसर व हिमालयातील थंड हवेचे ठिकाण डलहौसी इत्यादी. येथे रवींद्रनाथांनी विविध व्यक्तींची आत्मचरित्रे वाचली. इतिहास, खगोलशास्त्र, विज्ञान, कालिदासाचे काव्य व संस्कृत आदींचे अध्ययन केले. १८७७ साली प्रकाशित झालेल्या रचनांमुळे रवींद्रनाथ प्रथम लोकांसमोर आले. यात मैथिली कवीच्या विद्यापतीप्रवर्तित शैलीत रचलेल्या काही दीर्घ कविता होत्या. याच काळात त्यांनी संध्या-संगीत(१८८२), बंगाली भाषेतील पहिली लघुकथा भिकारिणी व सुप्रसिद्ध कविता निर्झरेर स्वप्नभंग आदी रचना लिहिल्या. बॅरिस्टर होण्यासाठी त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज येथे प्रवेश घेतला. परंतु १८८0 मध्ये कोणत्याही पदवीशिवाय ते बंगालला परतले. ९ नोव्हेंबर १८८३ रोजी त्यांनी मृणालिनीदेवी यांच्याशी विवाह केला. या विवाहानंतर त्यांना पाच अपत्ये झाली. १८९0 साली रवींद्रनाथांनी सध्याच्या बांग्लादेशातील सियाल्दा येथील टागोर घराण्याची मालमत्ता सांभाळण्यास सुरुवात केली. त्यांची पत्नी व मुले १८९८ साली येथे त्यांच्या सोबत आली. या काळात ते जमीनदार बाबू या नावाने ओळखले जात होते. हा काळ रवींद्रनाथांचा साधना काळ म्हणून ओळखला जातो. त्यांनी नंतर गल्पगुच्छ नावाचा ८४ कथा असलेले तीन खंडी पुस्तक प्रकाशित केले. आवेग व विरोधाभासयुक्त असे ग्रामीण बंगालचे सुरेख चित्र यात रवींद्रनाथांनी रेखाटले आहे. १९0१ साली रवींद्रनाथ सियाल्दा सोडून शांतिनिकेतन येथे राहण्यास आले. एका आर्शमाची स्थापना करणे हा त्यांचा उद्देश होता. या आर्शमात त्यांनी एका प्रार्थना-गृहाची, प्रयोग-शील शाळेची, बागबगीचा व ग्रंथालयाची स्थापना केली. रवींद्रनाथांच्या पत्नीचा व दोन मुलांचा मृत्यू येथेच झाला. वडिलांचे देहावसान १९ जाने १९0५ ला घडले व वारसदार म्हणून रवींद्रनाथांना नियमित मासिक उत्त्पन्न मिळू लागले. याशिवाय त्यांना त्रिपुराच्या महाराजांकडून आर्थिक साहाय्य, कौंटुबिक दागदागिने व पुरी, ओडिशा येथील बंगला विकून काही प्राप्ती झाली. या काळात त्यांचे साहित्य बंगाली व विदेशी वाचकांचे आधिकाधिक लक्ष खेचू लागले होते. नैवेद्य (१९0१) व खेया (१९0६) या रचना या काळात प्रकाशित झाल्या. याशिवाय कवितांचा अनुवाद करणेही सुरू होते. १४ नोव्हेंबर १९१३ रोजी स्वीडिश अकादमीचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्याची बातमी रवींद्रनाथांना समजली. गीतांजली या रचनेबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. गीतांजलीचे भाषांतर स्वत: रवींद्रनाथांनीच केले होते. १९१५ साली त्यांना ब्रिटिश सरकारने सर ही पदवी दिली. १९१९ च्या जालीयनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ती सरकारला परत केली. १९२१ साली रवींद्रनाथ व कृषी-अर्थतज्ज्ञ लिओनार्ड के एल्महिस्ट यांनी शांतिनिकेतन जवळील सुरुल येथे एका ग्रामीण पुनर्निर्माण संस्थेची स्थापना केली. याच संस्थेचे रवींद्रनाथांनी पुढे श्री-निकेतन असे नामकरण केले. श्री-निकेतनच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या प्रतिकात्मक स्वराज्य चळवळीला पर्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. ज्ञानसंवर्धनातून अज्ञानी व असहाय्य ग्रामीण भागाची सुटका होईल या उद्देशाने त्यांनी विविध देशातील विद्वान, दाते व अधिकार्‍यांस या उपक्रमात सहभागी करून घेतले. १९३0 सालापासून त्यांनी भारतातील पराकोटीच्या जातीयतेविरुद्ध प्रचार सुरू केला. नाट्य-कविता यांद्वारे जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. केरळच्या गुरुवायूर मंदिरात दलितांना प्रवेश देण्यासाठी त्यांनी आवाहन केले. जीवनाच्या शेवटच्या दशकात रवींद्रनाथ पूर्णपणे जनसन्मुख होते. त्यांची लोकप्रियता विशेषत: बंगालमध्ये शिखरावर होती. १५ जानेवारी १९३४ रोजी बिहारमध्ये झालेल्या भूकंपाची, महात्मा गांधींनी दलित अत्याचाराचा परमेश्‍वराने घेतला सूड अशी संभावना केली. या वक्तव्याचा रवींद्रनाथांनी निषेध केला. बंगालच्या आर्थिक व सामाजिक अवनतीबाबत व कोलकत्यातील भयावह दारिद्यबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या दारिद्यावर केलेल्या मुक्तछंदातील १00 ओळींच्या कवितेचा प्रभाव सत्यजित रे यांच्या अपुर संसार ( अपूचे जग) या चित्रपटावरही पडलेला दिसतो. पुनश्‍च (१९३२), शेष सप्तक (१९३५), पत्रपुत (१९३६) आदी गद्यपद्यांचा समावेश असलेले स्वत:च्या लिखाणाचे १५ खंड संपादित केले. याशिवाय चित्रांगदाह, श्यामा (१९३९), चंडालिका (१९३८) सारख्या नृत्य-नाटिकांवर विविध प्रयोग केले. याशिवाय दुई बोन (दोन बहिणी) (१९३३), मलंच (१९३४), चार अध्याय (१९३४)आदी कादंबर्‍या लिहिल्या. अखेरच्या काळात विज्ञानात रवींद्रनाथांनी विशेष रस घेतला. यातूनच त्यांच्या विश्‍वपरिचय या निबंधसंग्रहाची निर्मिती झाली. रवींद्रनाथांच्या आयुष्यातील शेवटची चार वर्षे प्रदीर्घ व्याधी व आजारपणांनी व्यापली.

No comments:

Post a Comment