Saturday 5 September 2020

शास्त्रज्ञ जॉन डाल्टन


जॉन डाल्टन हा ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ; भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ होता. डाल्टनचा जन्म .क्वाकर कुटुंबात इंग्लंडच्या कुम्बरलॅन्ड प्रदेशातील कॉकरमाऊथ च्या जवळ असलेल्या इगल्सफील्ड या गावी दिनांक ६ सप्टेंबर रोजी झाला. त्याचे वडील विणकर होते. डाल्टनचे शिक्षण गावाजवळच असलेल्या पर्डशाव-हॉल खाजगी शाळेत झाले. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी डाल्टन मँचेस्टरच्या नव महाविद्यालय (न्यू कॉलेज) येथे निसर्ग तत्व-ज्ञान आणि गणित विषय शिक्षक पदावर रुजू झाला. येथे तो त्याच्या वयाच्या चौतिसाव्या वर्षापयर्ंत काम केले. निसर्ग तत्व-ज्ञान आणि गणित याच विषयात, खाजगी शिक्षक (ट्युटर) म्हणून काम करायचे असे डाल्टननी ठरविले आणि प्रारंभ केले.अणुसिद्धांत आणि वायूचे गुणधर्म यांसंबंधी महत्त्वाचे संशोधन करणारा हा शास्त्रज्ञ. १७८७ पासून डाल्टन यांनी वातावरणाच्या नोंदी ठेवण्यास सुरुवात केली. मृत्यूपयर्ंत यांनी दोन लाखांहून अधिक नोंदी संकलित केल्या. १७९३ मध्ये जॉन डाल्टन यांनी रंगांधत्वाचा शोध लावला. वातावरण विज्ञान हे एक शास्त्र आहे, या दृष्टीने त्यांनी अभ्यास केला व तशी संकल्पना दृढ केली. त्यामुळे डाल्टन यांना जगभर प्रसिद्धी मिळाली. अणू हे अविभाज्य व अविनाशी आहेत, असे त्यांचे मत होते. डाल्टन यांची अनेक मते पुढे चुकीची ठरली असली, तरी त्यांचा अणुसिद्धांत व अणुभाराची कल्पना मात्र मूलभूत व महत्त्वाची ठरली. त्यांच्या या सिद्धांतामुळे रसानशास्त्रात एक मोठी क्रांती घडून आली. यामुळे १८२२ मध्ये रॉयल सोसायटीने डाल्टन यांना सन्माननीय सदस्यत्व बहाल केले. १८२५ मध्ये याच अणुसिद्धांतामुळे बहुमानपदक देऊन त्यांना गौरव करण्यात आला. दि. २७ जुलै १८४४ रोजी त्यांचे निधन झाले.

No comments:

Post a Comment