Tuesday 9 June 2020

आदिवासी समाजक्रांतिकारक बिरसा मुंडा


आदिवासी समाजक्रांतीचे जनक व एक स्वातंत्र्यसेनानी. त्यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांचा जन्म झारखंडमधील इतिहातु या छोट्याशा खेड्यात झाला. वडील सुगना व आई करमी. जन्म गुरुवारी म्हणजे विस्युगवार किंवा बृहस्पतिवार या दिवशी झाला, म्हणून त्यांचे नाव 'बिरसा' ठेवण्यात आले. बिरसा यांच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे बिरसांच्या जन्मानंतर सर्व कुटुंब उदरनिर्वाहासाठी
बिरसांची आत्या दासकीर हिच्या आयुभातु या गायी गेले. बासरी व दुईला वाजविणे, नृत्य, नकला, चित्र रेखाटणे, आखाड्यात जागे इत्यादी छंदही त्यांच्या अंगी होते.
बिरसांना शिक्षणाची आवड होती. शिक्षणासाठी
अंगीकारलेल्या ख्रिश्चन धर्माचा त्यांनी त्याग केला.
उदरनिर्वाहासाठी ते बांदगाव येथे वास्तव्यास होते  (१८९०-९४).  त्यांचा विवाह हिरीयाई नामक मुलीशी झाला; परंतु अल्प काळातच तिचे निधन झाले. बिरसा यांनी आनंद पाटे या वैष्णवपंथीयांकडून धार्मिक शिक्षण घेतले. हे शिक्षण घेत असताना मुंडा जमातीच्या परंपरागत जीवनपद्धतीमध्ये, धर्मामध्ये परिवर्तन व सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हिंदू, ख्रिश्चन व मुंडा आदिवासी या धर्मातील चांगली तत्वे एकत्रित करून नव्या बिरसाईट (Birsaites) धर्माची स्थापना करून त्यांनी लोकसंघटन केले, तसेच मुंडा जमातीत एकता निर्माण
केली. ईसाई धर्म हा विदेशी असल्यामुळे तो आपल्या पूर्वजांच्या परंपरेला कलंकित करणारा आहे, अशी लोकगागृती ते करू लागले. त्यामुळे ते भगवान बिरसा म्हणून ओळखले जाऊ लागले.
१८५७ च्या क्रांतीनंतर इंग्रजांनी छोटा नागपूर प्रदेशातील मुंडा आदिवासींच्या शेतजमिनी हिरावून घेतल्या होत्या. त्या परत मिळविण्यासाठी मुंडांचे प्रमुख ज्यांना 'सरदार' म्हटले जात, त्यांनी इंग्रजांविरुद्ध संपर्ष सुरू केला, तो 'सरदारी लढाई' म्हणून प्रसिद्ध झाला. या आंदोलनात्मक लढाईचा बिरसांच्या मनावर मोठा प्रभाव पडला होता. त्यांनी इंग्रजांच्या गुलामीत
असलेल्या आदिवासी समाजाला मुक्त करण्यासाठी क्रांतिकारक चळवळीला सुरुवात केली.
त्यामुळे अनेक मुंडा आदिवासीनी बिरसांबरोबर सरदार आंदोलनात सहमाग घेतला. विरसांनी कायद्याची लहाई सोडून २५ डिसेंबर १८९९ पासून इंग्रज अधिकारी, इंग्रजधार्जिणे ठेकेदार, जमीनदार, सावकार व ख्रिश्चन धर्मप्रसारक यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत प्राणघातक हल्ले करण्यास सुरुवात केली. बिरसांना जो कोणी पकडून देईल, त्यासाठी इंग्रजांकडून ५०० रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले. पैशाच्या लालसेपोटी मनमारू व जबाईकला या गावातील काही युवकांनी बिरसा जंगलात असल्याची बातमी इंग्रजांना दिली.
३ फेब्रुवारी १९०० रोजी विरसांना पकडण्यात आले. रांची येथे कैदेत असताना शाजांनी त्यांचा अतोनात छळ केला. रोयेच त्यांचे ९ जून १९०० रोजी निधन झाले. ब्रिटिशांनी असा दावा केला की तो कोलेरामुळे मरण पावला, त्याने या रोगाची लक्षणे कधीही दर्शविली नाहीत.२५ वर्षांच्या अल्प कालावधीसाठी तो जगला तरी त्याने आदिवासींच्या मनोदशाला उत्तेजन दिले आणि त्यांना छोटानागपुरच्या एका छोट्याशा शहरात आपले आणि ब्रिटीश शासकांना दहशतवादाचा सामना करावा लागला. त्याच्या मृत्यूनंतर चळवळीचा नाश झाला. तथापि, चळवळ किमान दोन मार्गानी महत्त्वपूर्ण होती. सर्वप्रथम तो औपनिवेशिक सरकारला कायद्याची अंमलबजावणी करण्यास भाग पाडत असे जेणेकरून आदिवासींची जमीन विकास (बाहेरील) द्वारे सहजपणे काढून घेतली जाऊ शकत नाही. दुसरे म्हणजे पुन्हा एकदा दाखवून दिले की आदिवासी लोकांना अन्यायविरोधी निषेध आणि औपनिवेशिक नियमांविरुद्धचा राग व्यक्त करण्याची क्षमता आहे. त्यांनी त्यांच्या स्वतः च्या पद्धतीने आणि संघर्षाच्या चिन्हे सोपून काढल्या.


No comments:

Post a Comment