Sunday 14 June 2020

जागतिक रक्तदान दिवस

मानवाची निर्मिती ही ईश्‍वराची सर्वात श्रेष्ठ कलाकृती आहे. मानवाचे जीवन म्हणजे ईश्‍वराने दिलेली मोठी देणगी आहे. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर नवनवीन प्रयोग केले. एका मानवानेच रक्त मानवाचे जीव वाचून शकते. दुसर्‍यावर मरण्याची पाळी अपघातात येत असते. अतिरिक्त रक्तस्त्राव, रक्तक्षय, कर्करोग आणि इतर गंभीर आजारांमध्ये रोग्याला रक्त मिळाले नाही तर, तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते .अशावेळी एका मानवाचेच रक्त दुसर्‍या मानवाचे प्राण वाचू शकतात. कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही.
कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवाचे प्राण वाचू शकत नाही. मानवाचे रक्तदान हे मानवाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करून देते. दरवर्षी सुमारे साडेसात लाख बाटल्या रक्त लागते. ही अत्यावश्यक गरज भागविण्यासाठी फक्त ७0 ते ७५ टक्के पर्यायी रक्तदाता किंवा व्यावसायिक रक्तदात्यांकडूनही अत्यावश्यक गरज भागविली जात आहे. आता इच्छुक रक्तदातांची काळाला गरज आहे. मानवाच्या शरीरात साडेचार ते पाच लिटर रक्त शरीरामध्ये असते. रक्तदानानंतर छत्तीस तासांनी साधारणपणे रक्ताची पातळी पूर्ववत होते. दोन ते तीन आठवड्यांमध्ये रक्तपेशी पूर्ववत होतात. दान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही. रक्तदान केल्यानंतर २0 ते ३0 मिनिटे विश्रांतीनंतर ती व्यक्ती पूर्ववत काम करू शकते. रक्तदान करण्यासाठी साधारणत: १८पेक्षा जास्त व ६0 पेक्षा कमी वय लागते. वजन ५0 किलोपेक्षा जास्त हवे. हिमोग्लोबिन १२.५ टक्क्य़ांपेक्षा जास्त असावे.
काविळ, मलेरिया, टायफाइड, डेंग्यु, चिकनगुनिया, एका वर्षामध्ये कोणतीही शस्त्रक्रिया झाली असल्यास, अनेमिया असल्यास, गुप्तरोग, क्षयरोग, कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह यासारखे काही असाध्य आजार किंवा वयोपरत्वे आजार असल्यास रक्तदान करू नये. तसेच रक्तदाताच्या हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यामुळे त्यांना नाकारले जाते. अशा वेळी हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यासाठी खालील आहार घ्यावा. पालेभाजी- माठ, मेथी, चवळी व पालक, मोड आलेली कडधान्ये, फळे -चिकु, पपई, सफरचंद, आवळा, कलिंगड, केळे, संत्री, मोसंबी, द्राक्षे, ओला खजूर, भाज्या- ओले वाटाणे, भोपळा, सर्व हिरव्या फळभाज्या, पडवळ, परवर, गवार, चहा व पावटे खाण्याचे टाळावे. रक्तदानास येण्यापूर्वी रात्री शांत झोपणे, आपला नियमित आहार घेणे, विनाकारण कोणतेही औषध, गोळ्या घेऊ नयेत. आपल्या वाढदिवसाला वाचून एखाद्याचे प्राण,अनमोल भेट देऊन करूया रक्तदान.
रक्तदानाचे फायदे
शरीरात नवीन रक्ताची निर्मिती होते, रक्तदानाचे ब्लड डोनर कार्ड मिळते. आवश्यकता पडल्यास त्या कार्डावरून दात्याला विनामूल्य रक्त मिळते, तुमच्या रक्तदान दुसर्‍या रुग्णांसाठी जीवनदायी वरदान ठरते. दान केलेल्या रक्ताचे पुढे काय होते? रक्तपेढय़ांमध्ये दान केलेल्या रक्ताचा गट निश्‍चित केला जातो. त्यानंतर रक्ताच्या एचआयव्ही, कावीळ इत्यादी आजारांच्या चाचण्या केल्या जातात. या चाचण्यांनंतर रक्त रक्तपेढय़ांमधून वेगळे केले जाते. काही वेळा रक्तातील विविध घटक वेगळे केले जातात. जसे की, फ्रेश फ्रोझन प्लाज्मा, पॅकसेल ब्लड, सिरम इत्यादी. भाजलेले रुग्ण, अतिरक्तस्राव झालेले रुग्ण, गंभीर अत्यवस्थ रुग्ण यांना हे रक्त दिले जाते.
रक्तदानानंतर काळजी घ्यावी. रक्तदानानंतर लगेच शारीरिक श्रम, खेळणे, धावणे यापासून दूर राहावे. रक्तदानानंतर कमीत कमी ४८ तासांपर्यंत तरी मद्यपान करू नये. रक्तदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे जड वाहन चालवू नये. भरपूर पाणी प्यावे. कोणत्याही शासकीय रुग्णालयातील महानगरपालिका, रुग्णालय ज्या ठिकाणी रक्तपेढीची सोय आहे, त्या ठिकाणी रक्तदान करावे. मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही. कोणत्याही कारखान्यात रक्ताची निर्मिती होत नाही. रक्त फार काळ साठवता येत नसल्यामुळे सतत रक्तदानाद्वारेच रक्ताची गरज पूर्ण होते. थॅलसिमीया, सिकलसेल, पंडू रोग आजाराने ग्रस्त बालकांना, रुग्णांना रक्ताची नियमित आवश्यकता असते. कुणाला कधी आणि कुठे रक्ताची गरज पडेल हे सांगता येत नाही. आपल्या रक्तदान केलेल्या एका युनिटमधून रक्त व रक्त घटक वेगळे केले जातात. आपल्या रक्तदानाने एक ते तीन रुग्णांचे प्राण वाचू शकतात.

No comments:

Post a Comment