Tuesday 30 June 2020

चार्टर्ड अकाउंटंट दिवस

१ जुलै हा राष्ट्रीय CA दिवस म्हणून साजरा केला
जातो. कारण, हा दिवस इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड
अकाउंटंट्स ऑफ इंडियाची स्थापना दिवस आहे. चार्टर्ड अकाउंटंट्स हा पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित अभ्यासक्रम आहे. भारतीय घटनेने पारीत केलेल्या कायद्यान्वये
ही संस्था अस्तित्वात आली आणि सलग ७२ वर्षे
भारतात हिशेब तपासणे, कर सल्ला, व्यावसायिक
व्यवस्थापन या क्षेत्रांसाठी उत्तमोत्तम व्यावसायिक
समाजाला दिले आणि देत राहिले. चार्टर्ड अकाउंटेंट हा
भारतातील आर्थिकदृष्ट्या सगळ्यात स्वस्त; पण यशस्वी झाल्यावर सन्मान व कामाचे समाधान मिळवून देणारा व्यवसाय आहे.
प्रामुख्याने इतर व्यवसायात उमेदवार यशस्वी झाल्यावर त्याचा अनुभव घ्याची प्रक्रिया सुरू होते. पण, चार्टर्ड अकाउंटेंट अभ्यासक्रमात अंगभूत असलेली ट्रेनिंग मुले, उमेदवार परीक्षा पास झाल्याबरोबर मार्केटसाठी कार्यानुभव समृद्ध उपलब्ध असतो. चार्टर्ड अकाउंटंट या अभ्यासक्रमात सिन्सिअरिटी, कठोर परिश्रम आणि विषयाच्या खोलात जाऊन अभ्यास करण्याची वृत्ती जोपासली जाते आणि असेच विद्यार्थी यशस्वी होतात. चार्टर्ड अकाउंटंट्स हा असा अभ्यासक्रम आहे, की कलानुरूप बदलत जातो आणि जगाच्या, राष्ट्राच्या उद्योगविश्वाच्या गरजेनुसार व्यावसायिक अद्ययावत अभ्यासक्रम ठेवला जातो. भारतीय चार्टर्ड अकाउंटंटला परदेशात प्रचंड संधीउपलब्ध आहेत. भारतीय चार्टर्ड अकाउंटंट परदेशातल्या उद्योगविश्वात स्वतःचे स्थान निर्माण करू शकतो. त्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड आणि स्कॉटलंड या देशातील संस्थानबरोबर म्युच्युअल रेकग्निशन ॲग्रिमेंट्स केले आहेत. त्यामुळे भारतीय चार्टर्ड अकाउंटंटला त्या देशात थोडेच विषयांचे पेपर लिहून त्या देशातील पदवी मिळवता येऊ शकते. चार्टर्ड अकाउंटेंट झाल्यावर बऱ्याच प्रकारचे करिअर ऑपशन्स उपलब्ध असतात. ऑडिट आणि कर सल्लागार या पूर्वापार चालत आलेल्या व्यावसायिक संधीव्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या विषयांत काम करता येते. कारण, बिझनेस प्रोसेसचे उत्तम ज्ञान त्याला असते. इन्फॉर्मेशन सिस्टिम ऑडिट, फॉरेन्सिक ऑडिट, गुंतवणूक सल्ला, इन्शुरन्स ही नवीन क्षेत्रे खुले झाली आहेत. आयएफआरएस या क्षेत्रात चार्टर्ड अकाउंटंट्सने प्रावीण्य मिळविले आहे.
चार्टर्ड अकाउंटंट हा राष्ट्र उभारणीत भागीदार म्हणून
ओळखला जातो आणि कोविडनंतरच्या बदलत्या जगात एक राष्ट्राचा आधारस्तंभ म्हणून उभा राहील, यात शंका नाही. या CA डेच्या निमित्ताने सर्व व्यावसायिकांचे हार्दिकअभिनंदन आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा!

No comments:

Post a Comment