Wednesday 10 June 2020

उद्योगपती राहुल बजाज

राहुल बजाज यांचा जन्म, सावित्री आणि कमलनयन बजाज या मातापित्यांच्या पोटी, कलकत्ता येथे १0 जून १९३८ रोजी मारवाडी कुटुंबात झाला. व्यावसायिक असलेल्या या मारवाडी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय संपन्न होती.ते बजाज ग्रुप उद्योग समूहाचे चेअरमन व भारतीय संसदेच्या राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांना २00१ साली पदमभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रूपा घोलप या महाराष्ट्रीयन तरुणीशी १९६१ साली राहुल यांचा विवाह झाला.
रूपा या त्या काळातील सौंदर्यवती व नवोदित मॉडेल होत्या. राहुल व रूपा यांना राजीव (जन्म - १९६६), संजीव (जन्म - १९६९), सुनयना केजरीवाल (जन्म-१९७१) हि तीन मुले आहेत. हे भारतामधील एक उद्योजक आहेत. बजाज ऑटो या कंपनीचे ते संचालक आहेत. औद्योगिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना इ.स. २00१ साली पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. दरम्यानच्या काळात राहुल बजाज यांचे पुत्र राजीव बजाज आणि संजीव बजाज बजाज कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये प्रवेश केला. त्यांची मुलगी सुनयना यांचा विवाह तेमाझेक इंडिया चे माजी प्रमुख मनीष केजरीवाल यांच्याशी झाला.
राहुल बजाज यांचे आजोबा जमनालाल बजाज हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते. राहुल यांच्या आजोबांना महात्मा गांधी आपला पाचवा पुत्र मानत असत. जमनालाल बजाज हे जवाहरलाल यांचेही खूप जवळचे मित्र होते. काँग्रेस पक्ष्याच्या उभारणीत व राष्ट्रीय चळवळीत त्यांचे योगदान महत्वाचे होते. बजाज आणि नेहरू या घराण्याचे गेल्या तीन पिढय़ांचे कौटुंबिक संबंध आहेत. कमलनयन आणि इंदिरा गांधी दोघे काही काळ एकाच विद्यालयात शिकत होते. कमलनयन यांच्या पहिल्या अपत्याचे राहुल हे नाव स्वत: जवाहरलाल नेहरू यांनी सुचवलेलं आहे. राहुल यांचे बालपण अतिशय शिस्तीच्या वातावरानात गेले. कमलनयन बजाज हे महात्मा गांधींच्या वध्र्यातील संन्याशी आर्शमात वाढले.
राहुल यांचे शालेय शिक्षण मुंबईतील प्रतिष्ठित अश्या कॅथेड्रल आणि जॉन कॉनॉन या शाळांमधून झाले. त्यांनी १९६८ साली दिल्लीतील सेंट स्टीफन महाविद्यालयातून इकॉनॉमिक्स विषय घेऊन बी.ए (ऑनर्स ) हि पदवी मिळवली. मुंबईत परतल्यावर, दोन वर्ष सकाळी सरकारी विधी महाविद्यालयात कायद्याचा अभ्यास करता करता बजाज इलेक्ट्रॉनिकस मध्ये उमेदवारी केली. १९६४ साली त्यांनी हार्वर्ड विद्यापीठाची व्यवस्थापन क्षेत्रातील (एम.बी.ए.) पदवी प्राप्त केली.
१९६५ साली ते बजाज ग्रुप चे चेअरमन झाले. २00५ साली चेअरमन पदावरून पायउतार झाले. त्याचे पुत्र राजीव हे बजाज ग्रुप चे व्यवस्थापकीय संचालक झाले. राहुल बजाज हे २00६ ते २0१0 या दरम्यान राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून गेले. २0१६ च्या फोब्र्ज च्या जगातील श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये राहुल बजाज हे ७२२ व्या क्रमांकावर होते. २00१ साली भारत सरकारने राहुल बजाज यांना उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील योगदानासाठी पद्यभूषण या पुरस्काराने सन्मानित केले. फ्रान्स सरकारने ह्यनाइट ऑफ द नेशनल ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर या सर्वोच नागरिक सन्मान देऊन सन्मानित केले.

No comments:

Post a Comment