Sunday 21 June 2020

महाकवी कुलगुरू कालिदास

आषाढ महिन्यातील पहिला दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा होतो. सोमवारी २२ जूनपासून आषाढ महिन्याला सुरुवात होत आहे. संस्कृत भाषेमधील महान साहित्यकार महाकवी कुलगुरू कालिदास यांचे साहित्य हजारो वर्षांपासून सर्वांना प्रेरणादायी ठरले आहे. कालिदास यांच्या साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय संस्कृत भाषेचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही. संस्कृत भाषेमध्ये त्यांनी अतिउच्च दर्जाचे साहित्य भारतवर्षाला दिलेले आहे. आषाढ महिना कालिदासांचा महिना म्हणून साजरा होतो.
कालिदासप्रेमी नागपूर जवळील रामटेक येथे असलेल्या कालिदासांच्या स्मृतिस्थळाला भेट देतात. कालिदास यांच्याविषयी सर्वच सौंदर्यप्रेमी, कलाप्रेमी, कवी, नाटककार, संस्कृतचे विद्यार्थी व अभ्यासक यांना कालिदासांविषयी अतिउच्च प्रेम, आदरभाव आणि त्यांच्या साहित्यनिर्मितीविषयी उत्सुकता आहे. जगातील कोणताही वाचक कोणत्याही भाषेत एकदा कालिदासांची साहित्यकृती हाती घेतली की पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवीत नाही. अशा जगभर प्रसिद्ध असलेले महाकवी, महान नाटककार कालिदास यांची आषाढातील त्यांच्या मेघदूतामुळे र्शावण आठवण न होणे शक्यच नाही.
कालिदासांच्या नावावर जवळजवळ ३0 साहित्यकाव्ये लिहिलेली आहेत. त्यापैकी ७ महाकाव्ये त्यांनी लिहिलेली आहेत असे मानले जाते. संस्कृत साहित्यामध्ये त्यांचे स्थान अतिउच्च कोटीतले आहे. त्यांच्या 'ऋतुसंहार' कुमार संभवम रघुवंशम मेघदुतम या कालेषु रचनाम तसेच मलाविकाग्नी मित्र विक्रमोवंशीय, अभिज्ञान शाकुंतलम या संस्कृतमधील नाट?-कम-महाकाव्य रचनेमुळे जाऊन त्यांना संस्कृत विद्वान म्हणून भारतभूमीत मान्यता मिळाली. तसेच ती जगभरात पसरली. साहित्यविश्‍वात अजरामर झाला. त्यामधील कुमार संभव रघुवंश ही दोन महाकाव्ये, मेहदूत आणि ऋतुसंहार अशी दोन खंडकाव्ये आहेत.
ऋतुसंहार हे काव्य त्यांच्या इतर साहित्यकृतीच्या तुलनेने फार लहान आहे. त्या त्यांच्या दीर्घ निसर्गकाव्याचे सहा भाग आहेत. निसर्गसौंदयार्मुळे तरुण मनाला भुरळ पडते. जो तरुण प्रेमाचे स्वप्न बघतो त्याला या जादुभ-या ऋतुचक्राच्या प्रेमात पडल्याशिवाय राहता येत नाही. निसर्गाने निर्माण केलेल्या ऋतुचक्राच्या प्रेमावर हे काव्य आहे.
कुमारसंभवम हे प्रसिद्ध पाच त्यांच्या महाकाव्यातील सुंदर, संस्कृत रचनेचे एक उत्तम उदाहरण आहे. यात हिमालयाचे वर्णन येते. हे काव्य कालिदासांनी 'सिवाला' वाहिले आहे. त्यामुळे जगाच्या जन्मदात्याच्या प्रेमाबद्दल वर्णन करण्याचे कालिदासांनी यात धाडस केलेले आहे. मूळ कल्पना ही स्कंद आणि शिवपुराण यांच्यावर आधारित आहे. शिवाबद्दल उमाचे पार्वतीचे प्रेम याचे परिणामकारक तसेच सुंदरतेचे श्रृंगारिक वर्णन आहे. हे महाकाव्य संस्कृतप्रेमीच्या मनात कायमचे स्थान मिळवून जाते.
रघुवंशम कालिदासांच्या महान काव्यातील एक महान रचना आहे. यात त्यांच्या साहित्यातून हे काव्य १९ विभागात रचले आहे. काव्यातून रघु, अजा, दशरथ राम आणि सीता यांच्या आदर्शवादाचे वर्णन आहे. ही रचना मानवियता व सत्यता याच्या जवळची आहे. ही त्यांची चांगली रचना आहे. या काव्याच्या सुरुवातीलाच कालिदास रामायण लिहिणा-या वाल्मिकीचे आभार मानतात.
मेघदूतम हे महाकाव्य इतर महाकाव्यांच्या तुलनेत फारच लहान काव्य आहे. मेघदूतम हे खंडकाव्य आहे. या खंडकाव्याची कल्पना कालिदासांनी अशी रचली आहे, की रामगिरीतील शापित यक्ष पत्नी अलका विरहाने व्याकुळ झालेली आहे. तेव्हा कालिदास निर्मित यक्ष प्रियकर पत्नीला आषाढातील मेघालाच सांत्वनपर प्रेम संदेश पाठविण्यासाठी दूत बनवितो. येथे कालिदासांनी आषाढी मेघालाच दूत बनविले आहे. यात शंभरच्यावर कडवे आहेत. स्त्रीच्या उत्कट प्रेमावर जिवंत राहणा-या मानवाची ही कथा मेघदूतममध्ये विस्तारितरीत्या अंतरली आहे. पहिल्या भारतवर्षातील निरनिराळ्या प्रादेशिक निसर्गसौंदर्याचे वर्णन आहे. तर दुसरा भाग आशा, भीती, विरह आणि इच्छापूर्ती विचारांवर आहे. यामध्ये माणूस प्रेमाशिवाय जिवंत राहू शकत नाही हे दाखविले आहे. ही रचना काव्यप्रेमींच्या नजरेतून सुटू शकत नाही. सिंहली भाषांतही मेघदूतममध्ये अनुवाद झालेले आहेत. यावर ५0 टीकाग्रंथ लिहिण्यात आलेले आहेत.
मलविकाग्निनित्रम ही रचना म्हणजे एक महान नाटक, एक नामवंत नाटककारांपेक्षा कालिदास हे काही कमी नव्हते. त्याचबरोबर ते महाकवी तर होतेच, पण त्यांच्यामधला नाटककार मोठा की कवी मोठा हे मलाविकाग्निनित्रम वाचल्यावर फारच कठीण आहे असे वाटते. एवढे निश्‍चित आहे की ते संस्कृतमधील संव्यासाची आहेत. आनंदी कवी आणि प्रतिभावंत नाटककार, रचनाकार हे गुण कवीतच एका ठिकाणी दिसतात. कालिदास राजकवी असल्यामुळे त्यांनी राजेशाही, राजदरबारी घरातील प्रेमाचे नाटकीय सादरीकरण मोठ्या गमतीदारपणे या रचनाकृतीत सादर केलेले आहे. या नाटकातून प्रणय, स्पर्धा राग, अनुनय, वंचना फजिती अशा अनेक भावनांचे चित्रण आलेले आहे. प्रेमात प्रावीण्य असलेल्या अग्निमित्र रागावर ही नाट्यकृती आधारित आहे. कालिदासांच्या रचना पाहता पाऊस आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रेम वात्सल्य यांचे अतूट नाते आहे.

No comments:

Post a Comment