Wednesday 10 June 2020

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी
१० जून १९९९ ला केली.पक्षाच्या वर्धापन दिनाला देश आणि राज्यातील परिस्थिती कठीण बनलेली आहे. कोरोना संकटाने देश आणि महाराष्ट्र वेढलेला आहे. औद्योगिकदृष्ट्या क्रमांक एकचे राज्य महाराष्ट्र आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई. कोरोनाच्या संकटात सगळ्यात भीषण अवस्था मुंबईची झाली. मुंबईबरोबर ठाण्यापासून कोल्हापूरपर्यंत आणि नाशिकपासून नागपूरपर्यंत महाराष्ट्रभर सगळीकडे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाच्या आरोग्य व्यवस्थेपुढे आव्हान उभे ठाकले. या आव्हानाला सामोरे जात असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या यंत्रणेला नेतृत्व दिले आणि जनतेसमोर सातत्याने वस्तुस्थिती ठेवत दिलासा दिला.

या संकटात संकटात कायदा-सुव्यवस्था महत्त्वाची बाब. गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी अतिशय तडफेने ही बाब सांभाळली. कोरोना संकटामुळे देशाचे आणि राज्याचे अर्थकारण संपूर्णपणे कोलमडले आहे. लॉकडाउन एक, दोन, तीन, चार, पाच यामुळे रोजगार संपला. हातावरचे पोट असणारे अक्षरशः जीवन-मरणाची लढाई लढू लागलेत. सामान्य माणूस, कष्टकरी, शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्याचे काम करण्याची आवश्यकता आहे. कोरोना काम देणे ही कामे संघटनेतर्फे हाती घेतली जाणार आहेत.
शाहू-फुले-आंबेडकर परंपरेतील पुरोगामी पाऊल उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्रिमंडळातील सर्व सदस्य, प्रदेश ते जिल्हास्तरीय सर्व पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी एकदिलाने, एकजुटीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सेवेचा एक नवा धडा जनतेसमोर आणतील. पक्षाचा यंदाचा वर्धापन दिन लोकसेवेसाठी समर्पित करतील. महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि काँग्रेससमवेत महाविकास आघाडी स्थापन केलीय. साहजिकच
प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी काम करीत राहणार आहे. ज्याअर्थी, आपण एकत्र येऊन महाराष्ट्राचा कारभार चालवत आहोत, त्याअर्थी तीन पक्षात विसंवाद नसावा, अशी जनतेची अपेक्षा आहे. काही वेळेला वरिष्ठ स्तरावर नेत्यांमध्ये मतभेद होऊ शकतात. त्याची झळ सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोचू न देण्याची जबाबदारी आपणाला स्वीकारावी लागेल. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी २५ वर्षांपूर्वी राज्यात पहिल्यांदा महिला धोरण अमलात आणले. सगळ्या देशाने त्याचे अनुकरण केले. शरद पवार
यांनी महिला सक्षमीकरणात टाकलेले पुरोगामी पाऊल शाहू-फुले-आंबेडकर यांच्या परंपरेतील आहे. २१ जूनला या धोरणाला २५ वर्षे होतील. गेल्या २५ वर्षांत महिला स्थानिक पातळीवर सत्तेत सहभागी झाल्या. सरपंच, नगराध्यक्ष, महापौरपदापर्यंत पोचल्या. महिला सुरक्षेसाठी कायदे केले आहेत. त्यामध्ये आणखी काम करण्याची आवश्यकता आहे. आपण लोकसभेचे कामकाज पाहिल्यावर ठळकपणे एक नाव पुढेयेते, ते म्हणजे, खासदार सुप्रिया सुळे यांचे. उत्कृष्ट संसदपटूचा किताब त्यांना मिळाला. लोकसभेतील शंभर टक्के उपस्थिती, प्रश्न विचारण्यात आघाडीवर, चर्चेत सातत्याने सहभाग. मला वाटते हेच उदाहरण महिला
सक्षमीकरणासाठी खूप महत्त्वाचे आहे.

No comments:

Post a Comment