Monday 22 June 2020

विश्व-संचार


निसर्ग-भ्रमंती
कक्काबेला
ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही कक्काबेला जाऊ शकता. कक्काबे हे ठिकाण बंगळूरूपासून २७0 किलोमीटर अंतरावर आहे. म्हैसूरपासून रेल्वेस्थानकावर उतरून कक्काबेला जाता येईल. म्हैसूर ते कक्काबेदरम्यान बस बर्‍याच बस धावतात. कक्काबे हे छोटंसं गाव आहे. पावसाळ्यात या गावाचं सौंदर्य खुललेलं असतं. नजर जाईल तथे फक्त हिरवळ असते. इथल्या डोंगरांवरून कुर्ग तसंच आसपासच्या परिसराचं मनोहारी दृश्य दिसतं.  कर्नाटकमधलं थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे कक्काबेमधलं वातावरण आल्हाददायक असतं. या गावाचं अजून एक वैशिष्ट्य आहे. इथे दक्षिण-पूर्व आशियातल्या सर्वात मधुर अशा मधाची निर्मिती होते. या गावात कॉफीचे मळेही आहेत. पश्‍चिम घाटात वसलेल्या कक्काबे परिसरात विविध प्राणी आणि पक्षी पहायला मिळतात.  कक्काबेमध्ये पर्यटकांची फारशी वर्दळ नसते. त्यामुळे इथला निसर्ग अजूनही टिकून आहे. या गावात भातशेतीही पहायला मिळते. भाताच्या शेतांमध्ये तुम्ही मनसोक्त हिंडू शकता. कक्काबेमध्ये काही दिवस निवांत घालवता येतील. परीक्षेची धावपळ संपली की कक्काबेची सैर करायला काहीच हरकत नाही.


सुविचार
प्रथम स्वतःचे सेवक व्हा, देशसेवक व्हा, मग तुम्ही देशाचे स्वामी आपोआप व्हाल. - स्वामी विवेकानंद

बोधकथा
संकल्प
एक ऋषी बऱ्याच काळापासून यज्ञ करायचा प्रयत्न करत होते. परंतु त्यांच्या यज्ञाला काही यश येत नव्हते. त्यांच्या आश्रमापासून तेंव्हा राजा विक्रमादित्य चालले होते. त्यांनी त्या ऋषींची ही उदासी पाहिली आणि म्हणाले, 'ऋषिवर! तुम्ही असे उदास का? माझ्या राज्यात तुम्हाला काही त्रास होतो आहे का? माझ्या राज्यातील कोणी उदास, निराश राहिलेले मला योग्य वाटत नाही.' त्यावर ऋषी म्हणाले, 'महाराज! मी
बऱ्याच काळापासून यज्ञाचा प्रयत्न करतो आहे पण जसा अग्नी मला अपेक्षित आहे तसा तो माझ्या यज्ञातून प्रकट होत नाही.' त्यावर राजे विक्रमादित्य म्यानातील तलवार काढून म्हणाले, 'एवढीच गोष्ट आहे ना! मी आता या क्षणी संकल्प करतो की, जर आज संध्याकाळपर्यंत या यज्ञात अग्निदेव प्रकट झाले नाहीत तर मी माझे शीर या तलवारीने कापून या यज्ञात आहुती देईन.' यानंतर राजाने काही आहुत्या दिल्या व काही वेळातच त्या यज्ञात अग्निदेव प्रकट झाले. अग्निदेव राजांना म्हणाले, 'मी तुझ्या वर प्रसन्न आहे ! वर माग!' त्यावर राजा म्हणाले, या ऋषींची इच्छा पूर्ण करा ! त्यांचा यज्ञ संपूर्ण करा! त्यांच्या यज्ञाचे त्यांना मनोवांच्छित फळ त्यांना मिळू दे!'
यावर ऋषी म्हणाले, 'राजा ! तुम्ही एकतर अग्नीस प्रसन्न करून घेतले. पण मीही खूप प्रयत्न केले होते कि! पण आपण काही आहुत्या दिल्या आणि अग्नीस प्रकट कसे काय केले?' यावर राजा काही बोलण्या आधीच अग्निदेव उत्तरले, 'ऋषिवर! राजाने जे काही केले त्यात त्यांचा स्वतःचा काहीच हेतू नव्हता आणि त्यांचे कार्य हे दृढ निश्चयाने आणि ध्यासपुर्वक केले होते.

गॅझेटस
सॅमसंगचा स्वस्त फोन
सॅमसंगने लेवल स्मार्टफोन Galaxy A01 लाँच केला
होता. सॅमसंग गॅलेक्सी ए सीरिजमध्ये सध्या हा सर्वात
स्वस्त स्मार्टफोन आहे. सॅम मोबाइलच्या रिपोर्टच्या
माहितीनुसार, सॅमसंग आता गॅलेक्सी स्मार्टफोनचा स्वस्तातील फोन बनवण्याची तयारी करीत आहे. सॅमसंगचा हा स्वस्तातील फोन रिमूव्हेबल बॅटरी सोबत येणार आहे. म्हणजेच या फोनची बॅटरी काढता येऊ शकते. सॅमसंग या फोनचे नाव गॅलेक्सी A01e ठेऊ शकते. सॅमसंगचा हा स्मार्टफोन काही प्रमुख वैशिष्ट्यासह बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म गीकबेंचवर नजरेस पडला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन मॉडल नंबर SM-A013F सोबत गीकबेंच ४ वर दिसला आहे. हा सॅमसंग गॅलेक्सी A010 असू शकतो. सॅमसंगचा स्मार्टफोन Galaxy A01 गेल्यावर्षी SM-A015F
मॉडल नंबर सोबत आला होता.

माईंड ब्लो
पाळीव प्राणी माणसाला लाभदायक
घरात पाळीव प्राणी असणे अनेक कारणांमुळे माणसाला लाभदायक ठरू शकते, असे संशोधकांनी म्हटले आहे. पाळीव प्राण्यांमुळे माणसात अनेक गुण विकसित होतात तसेच त्यांचे आरोग्यही चांगले राहण्यासाठी मदत मिळते.शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात हे सिद्ध झाले आहे की, पाळीव प्राण्यांसोबत खेळताना आपल्या शरीरात ऑक्सिटोसिन तयार होत असते. हे हार्मोन मेंदू शांत होण्यास मदत करते. त्यामुळे चिंता आणि ताण कमी होतो. प्राणी पाळणार्यांमध्ये कॉर्टिसॉल या स्ट्रेस हार्मोन्सची पातळी कमी असल्याचेही अभ्यासात आढळले आहे. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता कमी होते. प्राण्यांच्या संगोपनामुळे क्वचितच एकटेपणा जाणवतो. सतत प्राण्यांची देखभाल करणार्यामध्ये भावनांवर नियंत्रण राहण्याबरोबरच, सामाजिक भान आणि स्वाभिमान या भावना वृद्धिंगत होतात.

फुल्ल फार्म
CMDRO : सेंट्रल मरीन डिझाईन रिसर्च ऑर्गनायझेशन
FERA : फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन अॅक्ट

वस्तुस्थिती
मोह फुलाचे झाड
आपल्या महाराष्ट्रातील यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गोंदिया या विदर्भातील जिल्ह्यांमधील जंगलात मोठ्या प्रमाणात मोहाची झाडे आहेत. 'मोहा'चे झाड म्हणजे रोजगार देणारे एक महत्त्वाचे साधन आहे. मोहझाड जानेवारी ते मे महिन्यापर्यंत लोकांना रोजगार देते. मोह हे अनेक आदिवासिंचे पूरक अन्न असते. ते मोहापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवतात. मेळघाट, ताडोबा, नवेगाव, नागझिरा या भागात याचा भरपूर उपयोग घेताना स्थानिक दिसतात. या संपूर्ण भागात मोहापासून विशेष प्रकारची दारू तयार केली जाते. मेळघाटमध्ये या दारूला 'शिडू' म्हणतात. मोहाचे तेल आणि इतर औषधी गुणधर्म बघता मोह उपयोगी आहे.

सामान्य ज्ञान
१) 'गांधी' या चित्रपटामध्ये गांधीजींची व्यक्तिरेखा कोणत्या अभिनेत्याने साकारली होती?
२) भारतीय सैन्यात 'विजयंत' हे नाव कशाशी संबंधित आहे?
३) अजमेर हे ठिकाण कोणत्या संताशी संबंधत आहे?
४) ग्रँड ट्रंक रोडची निर्मिती कोणत्या शासकाने केली?
५) हॉकीच्या एका संघात किती खेळाडू असतात?
उत्तर : १) बेन किंग्जले २) रणगाडा ३) ख्वाजा मोईनुदिद्दन चिश्ती  ४) शेरशाह सूरी ५) अकरा

जाणून घ्या
शाळांच्या बसेस पिवळ्या रंगांच्या का?
शाळेच्या बसेसला नेहमी पिवळा रंग दिलेला आपल्याला पाहायला मिळताे. परंतु कधी प्रश्न पडला आहे का की या बसेसला पिवळाच रंग का दिला जाताे ?, तर या मागील एक महत्त्वाचे कारण आहे. ज्यामुळे पिवळा रंग या बसेसला देणे याेग्य ठरते.  सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशातील सर्वच बसेसला पिवळा रंग देणे बंधनकारक आहे. हा नियम भारतातच नाही तर जगातील अनेक देशांममध्ये आहे. परंतु यामागे एक कारण आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की लाल रंग लवकर नजरेत भरताे. त्यामुळे लाल रंगाचा सिग्नल लांबूनही आपल्या नजरेस पडताे. परंतु एका संशाेधनानुसार असे समाेर आले आहे की लाल रंगाच्या तुलनेत पिवळा रंग 1. 24 पट जास्त नजरेस भरताे. अंधारात पिवळा रंग सर्वप्रधम आपल्याला दिसताे. तसेच धुके असताना देखील पिवळा रंग त्यातून आपल्याला दिसताे. त्यामुळेच अनेकदा धुक्याच्या वेळेस पिवळ्या रंगाचा सिग्नल सुरु असल्याचे दिसते. त्याचबराेबर शहरांमधील स्ट्रीट लाईट सुद्धा पिवळ्या रंगाच्या असतात. या रंगामुळे अधिक प्रकाश पडताे.  त्यामुळे शाळांच्या बसेसला पिवळा रंग दिलेला असताे. ज्यामुळे एखादी दुर्घटना टाळता येऊ शकते. या रंगाबराेबरच अनेक नियम या बसेससाठी तयार करण्यात आले आहेत. लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकाेनातून हे नियम तयार करण्यात आले आहेत. 
     - संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत (सांगली) 7038121012

No comments:

Post a Comment