Tuesday 2 June 2020

पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ
(एसएनडीटी विद्यापीठ) हे भारतातील एक महिला विद्यापीठ आहे. याची स्थापना महर्षी घोडो केशव कर्वे यांनी केली. हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ आहे. एसएनडीटीची स्थापना पुण्यातली असली तरी त्याचे स्थलांतर मुंबईस होऊन तिथेच खऱ्या विस्ताराला सुरुवात झाली. या विद्यापीठाशी संबंधित सगळी महाविद्यालये एसएनडीटी कॉलेज' माणून ओळखली जाऊ लागली.

डिसेंबर, इ.स. १९१५ साली धोंडो केशव कर्वे यांनी इंडियन सोशल काँग्रेसच्या (भारतीय सामाजिक परिषद) अध्यक्षीय भाषणातून महिला विद्यापीठाची कल्पना सर्वप्रथम मांडली. जून, इ.स. १९१६ रोजी विद्यापीठाची औपचारिक स्थापना झाली. पाच विद्यार्थिनींचा पहिला वर्ग ५ जुलै, इ.स. १९१६ रोजी सुरू होऊन विद्यापीठाच्या कामाला आरंभ झाला. इ.स. १९१६ साली या विद्यापीठाची स्थापना भारतवर्षीय महिला विद्यापीठ (इंडियन विमेन्स युनिव्हर्सिटी) या नावाने झाली. सर विठ्ठलदास ठाकरसींनी या विद्यापीठाला १५ लाख रुपयांची देणगी दिल्यानंतर विद्यापीठाला त्यांच्या आईचे नाव देण्यात आले. १९२० साली विद्यापीठाचे नाव "श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ" असे झाले.
विद्यापीठातर्फे सुरुवातीला जी.ए. (गृहीतागमा) आणि पी.ए. (प्रदेयागमा) अशा दोन पदव्या दिल्या जात असत. इ.स. १९५१ साली या विद्यापीठाला महाराष्ट्र सरकारची मान्यता मिळाली. इ.स. १९९४च्या महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात एक वेगळे कलम (क्रमांक १०५) केवळ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठासाठी आहे. या विद्यापीठास महाराष्ट्रात तसेच इतर कोणत्याही राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात महाविद्यालये संलमित करता येतात. इ.स. १९५२ ते १९५७ या कालावधीत दिवाणबहादुर झवेरी यांनी कुलगुरूपद सांभाळले व यानंतर मात्र एक तप (१९५७ ते १९६९) लेडी ठाकरसीनी. या शेवटच्या बारा वर्षात १३ नवीन विभागांची/महाविद्यालयांची स्थापना झाली. यात मराठी, चित्रकला हे विभाग मुंबई व पुणे येथे, तसेच नसिंग महाविद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गृहविज्ञान महाविद्यालय ही महत्वाची महाविद्यालये होती. अर्थशाख, शिक्षणशास्त्र, ग्रंथपालनशाख, फूड सायन्स अँड न्युट्रिशन अशा पदव्युत्तर विभागांचा समावेशही होता. १९७९ ते १९७५ या काळात आणखी ११ विभागांची भर पडली आणि शिवाय पुण्यात एक शिक्षणशास महाविद्यालयही स्थापन झाले. भारतातील विद्यापीठात अन्यत्र न दिसणारे महिला विद्यापीठाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील शिक्षणशास्त्र विद्याशाखेतील अनेक विभाग आहेत. दोन शिक्षणशास्त्र विभाग, स्पेशल एज्युकेशन, शैक्षणिक तंत्रविज्ञान, मार्गदर्शन आणि समुपदेशन, शैक्षणिक व्यवस्थापन, भाषा अध्यापन, तसेच विद्यापीठ संचालित दोन शिक्षणशास्त्र महाविद्यालये सुद्धा आहेत. विद्यापीठाचे मुख्यालय मुंबईला चर्चगेटजवळ आहे. शिवाय त्याच्या मुंबईत जुहू येथे व पुण्यात कर्वे रोडला एक अशा दोन शाखा आहेत. मराठी, गुजराती, हिंदी, उर्दू या चार माध्यमांतून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनी या विद्यापीठाचा फायदा घेतात. एसएनडीटी महिला विद्यापीठाचा विस्तार केवळ महाराष्ट्र राज्यापुरताच मर्यादित नसून तो गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, गोवा आणि आसाम या आणखी सहा राज्यांतही झाला आहे. २०१५ साली विद्यापीठाचे शताब्दी वर्ष सुरू झाले. त्या शतक महोत्सवानिमित्त विद्यापीठाने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. एकविसाव्या
पातकातील ग्रंथालय म्हणजे नॉलेज सेंटर, नवीन सहा भाषाध्यापन विभागांसह बारा भाषांसाठी भाषाभवन, विज्ञान संस्था, डिझाइन संस्था, नॅनोटेक्नोलोजी संस्था, जनसंप्रेषण (Mass Communication) संस्था, सेंट्रल इक्विपमेंट मुविधा, स्पोर्टस कॉम्पलेक्स, महिलांसाठी आंतरराष्ट्रीय वसतीगृह, अतिथीगृश इ. प्रकल्पांसाठी संस्थेची जुळवाजुळव सुरू आहे.

No comments:

Post a Comment