Thursday 4 June 2020

गोळवलकर गुरुजी

उत्तुंग व्यक्तिमत्व, निरभ्र चारित्र्य, ज्वलंत राष्ट्रनिष्ठा
आणि संघटना कौशल्य असणारे, डॉ. हेडगेवार यांच्या नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सारथ्य करणारे गोळवलकर गुरुजी हे हजारो लाखोंच्या मनात आदराचे स्थान असलेले एक महान व्यक्तिमत्व होते. ५ जून १९७३ रोजी गुरुजींनी देहत्याग केला. गुरुजींचा जन्म नागपूर येथे १९ फेब्रुवारी १९०६ रोजी झाला. कोकणातील गोळवल हे त्यांचे मूळ गाव, परंतु वडिलांच्या नोकरीमुळे ते कुटुंब नागपुरात आले.

गुरुजींची आठ वडील भावंडे दगावली. नववं आणि शेवटचं अपत्य म्हणजे माधव तथा गुरुजी. शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. नागपुरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये इंटरपर्यंत शिक्षण झाल्यावर वैद्यकीय अभ्यास करण्याच्या इच्छेने ते लखनौला गेले. परंतु तेथे प्रवेश मिळाला नाही. मग ते वाराणसीला गेले आणि बनारस हिंदू विद्यापीठातून बी. एस्सी. व नंतर एम.एस्सी या पदविका प्राप्त केल्या. ते प्राणी शास्त्राचे विद्यार्थी होते. संशोधन करावे म्हणून ते मद्रासला गेले. परंतु हवामान न मानवल्यामुळे ते नागपूरला परत आले. त्यानंतर
एका अंध व्यक्तीकडून त्यांनी संगीताची संथा घेतली.
१९३३ मध्ये प्राणीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून बनारस
विद्यापीठाने त्यांची तीन वर्षांसाठी नियुक्ती केली.
त्यावेळी डॉ. हेडगेवार हे पंडित मदनमोहन मालवीय यांच्या भेटीसाठी येत असत. त्यावेळी हेडगेवारांनी
गुरुजींना पाहिले, जाणले व संघकार्यात त्यांना सहभागी करून घ्यावे असे त्यांना वाटले. परंतु १९३६  मध्ये गुरुजींचा विद्यापीठाचा सेवाकाळ संपल्यावर गुरुजी साधनेसाठी सारगाची येथिल आश्रमात गेले. १९३७ च्या मकर संक्रांतीच्या दिवशी अखंडानंदांनी गुरुजींना अनुग्रह दिला. काही दिवसांनी अखंडानंद समाधीस्थ झाले परंतु जन्म राष्ट्रकारणासाठी आहे. 'राष्ट्रदेवो भव' हा मंत्र जपत तू देशभर फिरशील.
आपल्या गुरुंच्या निर्वाणानंतर गुरुजी अस्वस्थ झाले. त्यांची आणि डॉ. हेडगेवार यांची भेट झाली. समाधीची जागा राष्ट्रहिताने घेतली. डॉ. हेडगेवारांना आपला उत्तराधिकारी मिळाला. त्यानंतर डॉ. हेडगेवारांनी संघाच्या काही निवडक  लोकांचे सिंदी येथे एक विचार शिबीर घेतले. त्यात संघाच्या प्रार्थना गीतापासून कार्यपध्दतीपर्यंत ध्येय धोरण ठरवले आणि आपल्या सर्व कार्याची धुरा गुरुजींच्या खांद्यावर ठेवली. डॉक्टरांच्या नंतर ३३ वर्षे गुरुजींनी संघाचे सारथ्य
केले. त्याच काळात संघाचा प्रसार आणि प्रचार फार मोठ्या प्रमाणात झाला. हे होत असताना संघबंदीचा आदेशहीआला. गुरुजींना कारावास घडला. त्यांना संशयित आणि देशद्रोही ठरविण्यात प्रयत्नही झाला. परंतु हा पालापाचोळा कधीच उडून गेला आणि राष्ट्राय स्वाहा' म्हणत गुरुजींचे संघकार्य राष्ट्रकार्य म्हणून सुरुच राहिले. 'नमस्ते सदावत्सले मातृभूमी' हे शब्द सदा ओठावर बाळगणाऱ्या गुरुजनांना कॅन्सर झाल्याची वार्ता आली आणि ५ जून १९७३ या
या दिवशी त्यांनी देहत्याग केला.

No comments:

Post a Comment