Wednesday 10 June 2020

जागतिक दृष्टिदान दिवस

खर तर हे संपूर्ण जग फार सुंदर आहे. आपल्या जवळपास असलेल्या प्रत्येक वस्तुत एक विशिष्ट प्रकारची सुंदरता आहे. ते पाहण्यासाठी एका विशिष्ट नजरेची आवश्यकता असते. या जगातील प्रत्येक वस्तू पाहण्यासाठी आपल्याला डोळ्यांचा सहारा घ्यावा लागतो. परंतु आपण कधी विचार केला की, जर हे डोळे नसते तर हे जग कसे असते? सगळीकडे अंधार असते, यात तीळमात्र शंका नाही. डोळ्यांचे महत्त्व जीवन जगणारा प्रत्येक माणूस जाणतोच.

जीवन जगत असतांना डोळे हे माणसाच्या शरीराचे एक महत्त्वाचे अवयव आहे. डोळ्याद्वारे माणूस संपूर्ण जग पाहू शकतो. खरे तर डोळे असणे अर्थात दृष्टी असणे हे जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे, असे म्हणायला हरकत नाही. परंतु काही लोकांना जन्मत:च दृष्टी नसते अर्थात डोळ्यात काही बिघाड असतो व त्याला कधीच काही दिसत नाही. खरे तर अशा व्यक्तींना अंधकारमय जीवन जगावे लागते. तसेच काही लोकांना अपघातात किंवा आजाराने आपली दृष्टी गमवावी लागते. जीवन जगत असतांना माणसाने आपल्या डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. खरे तर आपल्या डोळ्यांच्या काळ्या भागाला ह्यकार्निया म्हटले जाते. कार्निया हा डोळ्यांचा पर्दा आहे. जे बाहेरील वस्तूचे चित्र बनवून आपल्याला दृष्टी देतो. जर कार्नियावर एखादी इजा झाली तर आपल्याला दिसणे बंद होऊ शकते.
कार्निया अर्थात नेत्रपटल डोळ्यांच्या बुबुळावर काचासारखी लेयर (आवरण) असते. कार्निया अपघातात डोळ्यांना इजा झाल्याने किंवा विशेषत: लहानपणापासून आवश्यक असलेल्या पोषण आहाराच्या कमतरतेमुळे ती क्षतिग्रस्त होते. कार्निया क्षतिग्रस्त झाल्याने दिसणे बंद होते. कार्निया क्षतिग्रस्त झाल्याने ज्या व्यक्तीची दृष्टी चालली जाते त्या व्यक्तीच्या कार्निया प्रत्यारोपाणाद्वारे पुन्हा दृष्टी प्राप्त करू शकते. कार्नियाच्या जागी लावला जाणारा दुसरा कृत्रिम पर्याय आजपयर्ंत सापडला नाही. त्यामुळे दृष्टिदानाद्वारे आपण एखाद्याला दृष्टी देण्याचे, हे सुंदर जग पाहण्याची संधी देऊ शकतो. कोणत्याही वयाचा, कोणताही व्यक्ती दृष्टिदानाची शपथ घेऊ शकतो. खर तर दान केलेले डोळे कधीच विकत घेतले जात नाही व विकल्या जात नाही हे विशेष. जगातील सर्व धर्मीय पुढार्‍यांनी व पंडितांनी दृष्टिदान हे महादान असल्याचे मान्य करून दृष्टिदानाचे सर्मथन केले.
एखाद्या मरण पावलेल्या व्यक्तीची कार्निया जर कार्नियाच्या समस्येने पीडित व्यक्तीला मिळाल्या तर त्या पीडित व्यक्तीच्या जीवनातील अंधार दूर होऊ शकतो. परंतु डॉक्टर मरण पावलेल्या व्यक्तीच्या कर्निया तोपयर्ंत काढू शकत नाही जोपयर्ंत तो व्यक्ती आपले जीवन जगतांना दृष्टिदानाची शपथ लिखित स्वरुपात करत नाही. ज्या व्यक्तीने लिखित स्वरुपात शपथ घेतली नाही त्या व्यक्तीचे पण कार्निया मृत्युनंतर दान केले जाऊ शकते. जर त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी यासाठी परवानगी दिली तर.
दृष्टिदानाची शपथ घेतलेल्या व्यक्तीच्या मृत्युनंतर जवळच्या नेत्र संग्रह केंद्र किंवा नेत्र बँक सोबत संपर्क साधावा. आपण नेत्र संग्रह केंद्र, नेत्र बँक, शासकीय रुग्णालयात दृष्टिदानाबाबत विचार विनिमय करून आपल्या दृष्टिदानाची लिखित शपथ बाबतीचा फॉर्म भरून आपल दृष्टिदानाचे कार्ड घ्यावे खरतर संपूर्ण कुटुंबीयांनी एकत्रित दृष्टिदानाची प्रतिज्ञा घेतली तर सोयीचे ठरते. दृष्टिदानाला सर्वांनी आपल्या कुटुंबाची परंपरा बनवावी.
दृष्टिदानाचे महत्त्व समजून घेण्यासाठी १0 ते १६ जून दरम्यान दरवर्षी आपण दृष्टिदान सप्ताह साजरा करतो. या दृष्टिदान सप्ताहात दृष्टिदानाबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. भारतात सर्व लोकांनी दृष्टिदानाची संकल्पना केली तर भारतात एक दिवस असा येईल की, भारतात एकही कार्नियाने ग्रस्त दृष्टिहीन व्यक्ती राहणार नाही

No comments:

Post a Comment