Wednesday 3 October 2018

'गुगल गुरू'ला टक्कर देणार्‍या वेबसाईट्स'

 इंटरनेटवर काहीही सर्च करण्यासाठी सर्वांचे हक्काचे ठिकाण म्हणजे गुगल सर्च होय. पण गुगल सर्चपेक्षा तुम्हाला सर्च अधिक विस्तृत करायचा आहे आहे का? अर्थात या प्रश्नावर तुम्हाला इंटरनेटवर गुगलपेक्षा भारी काय असू शकते असा प्रश्न पडेल. पण काही विशिष्ट गोष्टी शोधण्यासाठी गुगलहून काही भन्नाट वेबसाईट आहेत. चला तर मग पाहूयात कोण आहेत गुगलचे प्रतिस्पर्धी..इंटरनेटवर काहीही सर्च करण्यासाठी सर्वांचे हक्काचे ठिकाण म्हणजे गुगल सर्च होय. पण गुगल सर्चपेक्षा तुम्हाला सर्च अधिक विस्तृत करायचा आहे आहे का? अर्थात या प्रश्नावर तुम्हाला इंटरनेटवर गुगलपेक्षा भारी काय असू शकते असा प्रश्न पडेल. पण काही विशिष्ट गोष्टी शोधण्यासाठी गुगलहून काही भन्नाट वेबसाईट आहेत. चला तर मग पाहूयात कोण आहेत गुगलचे प्रतिस्पर्धी..
   
क्लासडॉटसेंट्रलडॉटकॉम
या वेबसाईटच्या माध्यमातून आपण संगणक शास्त्र, वाणिज्य, आरोग्य विषयक, मानव्यशास्त्रविषयक ऑनलाईन कोर्स कोठे आहेत याची माहिती मिळवू शकतो. ही वेबपसाईट जवळपास जगभरातील ७00 विद्यापीठातील कोर्स विषयी माहिती देते. यात स्टँडफोर्ड, आयआयटी, हार्वर्ड, एमआयटी यासारख्या जागतीक दर्जाच्या विद्यापीठांचा समावेश आहे.

जस्टफ्रीबुक्सडॉटइन्फो
तुम्हाला जर फ्री ई-पुस्तके हवी असतील तर या वेबसाईटवर सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. किंड्ले, नुक, टॅबलेट यासारख्या ई-पुस्तके वाचण्यासाठीच्या गॅझेटसाठी असंख्य पुस्तके या सर्च इंजिनद्वारे शोधू शकता. यात जवळपास ७00हून अधिक ई- पुस्तकविषयक वेबसाईटवरील पुस्तके उपलब्ध आहेत.

लिसननोट्सडॉटकॉम
तीन लाखाच्यावर पॉडकास्ट चॅनल एकाच प्लॅटफॉर्मवर ऐकण्यासाठीची सर्वोत्तम वेबसाईट म्हणजे लिसननोट्सडॉटकॉम होय. यात जवळपास १ कोटी ८0 लाखांच्यावर पॉडकास्ट एपिसोड एका क्लीकवर उपलब्ध होतात. यात क्रीडा, उद्योग, शिक्षण, हास्य विषयक पॉडकास्ट ऐकूही शकता आणि डाउनलोड देखील करु शकता. केवळ पॉडकास्ट नव्हे तर येथून तुम्ही ई- पुस्तके देखील डाउनलोड करु शकता.
सर्चडॉटक्रिएटिव्हकॉमन्सडॉटओआरजी
पुस्तके, संगीत, आर्टवर्क आणि फोटोग्राफी यासंदभार्तील ५ कोटी डीजीटल संदर्भ तुम्ही या वेबसाईटवर मिळवू शकता. यातील अनेक प्रोजेक्ट तुम्ही अगदी मोफत देखील वापरू शकता.

एव्हरीस्टॉकफोटोडॉटकॉम
या वेबसाईटद्वारे तुम्हाला फ्री फोटो मिळू शकतील. त्याचा वापर तुम्ही स्वत:च्या प्रोजेक्टसाठी देखील करू शकतो. या वेबसाईटची मेंबरशीप मोफत आहे. इंटरनेटवर फोटो शोधणार्‍यांनी एकदा तरी या वेबसाईटला भेट दिलीच पाहिजे.

फॉण्टसिक्वेरलडॉटकॉम
जर तुम्ही वेब किंवा पिंटमध्ये डिझायनिंगचे काम करत असाल तर ही वेबसाईट तुमच्या बुकमार्कमध्ये असलीच पाहिजे. या वेबसाईटवर जाहिरात, वेबसाईट, अप आणि सॉफ्टवेअर आदीसाठी मोफत फॉन्ट उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे तुम्ही या फॉन्टचा व्यवसायासाठी देखील वापर करु शकता. या वेबसाईटवरील अधिक तर फॉन्ट मोफत आहेत.

जीनियसडॉटकॉम
एखाद्या गाण्याचे बोल काय आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर या वेबसाईटवर आपणाला जवळपास १७ लाख गाण्यांचे बोल, त्याचे व्हिडीओ, त्या गाण्याचा अर्थ याची माहिती मिळते. यात भारतातील लता मंगेशकर, किशोर कुमार, मोहम्मद रफी, ए.आर.रेहमान या गायक आणि संगीतकारांचा समावेश आहे.

ऑलरेसिपीजडॉटकॉम
या वेबसाईटवर तुम्हाला जवळपास जगभरातील ५0 कोटींहून अधिक पाककृती मिळतील. यात तुम्ही कोणतही एका पाककृतीमधील विशिष्ट पदार्थाचे नाव सर्च करुन त्याबद्दलची माहिती, त्याच्यापासून तयार करण्यात येणारे पदार्थ शोधू शकता. या वेबसाईटचे भारतीय व्हर्जन आहे. ऑलरेसिपीजडॉटकोडॉटइन यावर देखील तुम्ही भारतीय पाककृती शोधू शकता.

No comments:

Post a Comment