Saturday 6 October 2018

लोकहीतवादी

रावबहादुर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी (१८ फेब्रुवारी१८२३ - ९ ऑक्टोबर १८९२) हे १९ व्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने यांनी समाजसुधारणाविषयक शतपत्रे (वस्तुत: संख्येने १0८) लिहिली. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका 'शतपत्रांचा इत्यर्थ' मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. मुळात संख्येने १00 असलेल्या या निबंधात त्यांनी संस्कृतविद्या, पुनर्विवाह, पंडितांची योग्यता, खरा धर्म करण्याची आवश्यकता, पुनर्विवाह आदी सुधारणा ही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली. त्यांचे घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते. घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झाले. गोपाळराव देशमुखांचे वडील हरिपंत देशमुख हे पुण्यात दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस म्हणून काम करीत होते. त्यांना ग्रंथसंग्रहाची व वाचनाची विलक्षण आवड होती. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांनी त्या विषयावर सुमारे दहा पुस्तके लिहिली आहेत. १९ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी शिक्षणामुळे घडलेल्या पहिल्या काही नवशिक्षितांपैकी एक म्हणजे गोपाळ हरी होत. त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेत असतानाच इंग्रजीचा अभ्यास केला. वयाच्या २१व्या वर्षी ते न्यायालयात भाषांतरकार झाले. 'सदर अदालती'ची मुन्सिफीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १८६२पासून ते मुंबई सरकारच्या न्यायखात्यात न्यायाधीश झाले. त्या पदावर त्यांनी अहमदाबाद, नाशिक आणि सातारा येथील कोर्टात काम केले. लोकांनी ज्ञानी व्हावे आणि ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्या बाजूला ठेवाव्यात. इग्रंजी भाषेवर प्रभुत्व असावे असे त्यांना वाटायचे. र्शमातून संपत्ती निर्माण होते या सूत्रातून दारिद्र्य निर्मूलनासाठी काय करायला पाहिजे याची दिशा समजली. भारतात ज्ञानाबरोबरच तंत्रज्ञान व नाना प्रकारचे उद्योगधंदे वाढावेत ही त्यांची तळमळ होती. स्वदेशात विद्यावृद्धी होऊन स्वभाषेत नवे नवे ज्ञान प्रसारित झाल्याशिवाय भारताला जगातील इतर प्रगत राष्ट्रांच्या बरोबरीचे स्थान मिळणार नाही, असे त्यांना वाटत होते. रेव्हरंड जी. आर. ग्लीन यांच्या 'हिस्टरी ऑफ द ब्रिटीश एम्पायर इन इंडिया' या पुस्तकाच्या आधारे त्यांनी १८४२मध्ये, म्हणजे वयाच्या एकोणिसाव्या वर्षी 'भारताचा इतिहास' हे पुस्तक लिहिले. पुस्तकाचे प्रकाशन मात्र १८७८मध्ये झाले. १८४८ पासून त्यांनी मुंबईहून निघणार्‍या प्रभाकर या साप्ताहिकातलोकहितवादी या नावाने लोकहितार्थ लेखन सुरू केले. १८४८ ते १८५0 या काळात त्यांनी १0८ छोटे छोटे निबंध लिहिले. हेच निबंध लोकहितवादींची शतपत्रे नावाने ओळखले जातात. या शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाज सुधारणाविषयक विचार समाजासमोर मांडले. ही शतपत्रे प्रभाकर या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, वाड्मयीन, ऐतिहासिक आदी विषयांवर त्यांनी लहानमोठे असे सुमारे ३९ ग्रंथ लिहिले, दोन नियतकालिके चालविली, आणि ज्ञानप्रकाश व इंदुप्रकाश ही नियतकालिके काढण्याच्या कामी पुढाकार घेतला. लोकहितवादींनी अनेक उत्कृष्ट इंग्रजी ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले. लोकहितवादी हे १९ व्या शतकाच्या पूवार्धातील,म्हणजे रानडेपूर्व पिढीतील भारतातील अर्थशास्त्रज्ञ होते. मराठीतून लेखन करणारेही ते पहिलेच अर्थतज्ज्ञ. 'लक्ष्मीज्ञान' त्यांनी अँडम स्मिथप्रणीत अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले.

No comments:

Post a Comment