Saturday 20 October 2018

ऑनर ८ एक्स स्मार्टफोन भारतात लाँच



हुआवीचा उपब्रँड असलेल्या ऑनर स्मार्टफ ोन कंपनीने शुक्रवारी आपल्या एक्स सिरीज स्मार्टफोनच्या पोर्टफोलिओचा विस्तार करत धमाकेदार नवीन ऑनर ८ एक्स मॉडेल बाजारात आणला आहे. गेल्या महिन्यात कंपनीने चीनमध्ये हा स्मार्टफोन लाँच केला होता. कंपनीने तीन व्हेरियंटमध्ये ऑनर ८ स्मार्टफोन ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे. तसेच, या स्मार्टफोनची किंमत व्हेरियंटनुसार असून या माबाईलची किंमत १४,९९९ रुपयापासून सुरू होते.
ऑक्टा-कोअर किरीन ७१0 ची शक्ती असलेल्या या स्मार्टफोनमध्ये १६.५१ सेमी फुल वू नॉच डिस्प्ले असून ९१ टक्के स्क्रीन-टू-बॉडी असा गुणोत्तर आहे. तसेच २.५ डी डबल टेक्श्‍चर अरोरा ग्लास बॉडीमुळे मोबाईलला एक वेगळा लुक आला आहे. हा स्मार्टफोन सुरुवातीला अँमेझॉन इंडिया वेबसाईटवर ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. त्यानंतर या स्मार्टफोनची अधिकृत विक्री मार्केटमध्ये २४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. स्मार्टफोनच्या पाठीमागे प्रिमियम ग्लास फिनिशिंग देण्यात आले आहे. तर फ्रंटला नॉच डिस्प्ले आहे. तसेच, हा स्मार्टफोन ओरिओ बेस्ड इएमयूआय ८.२.0. सिस्टिमवर आधारित आहे. या स्मार्टफोनच्या रिअरमध्ये डुअल कॅमेरा देण्यात आला आहे. या प्रायमरी कॅमेरा २0 मेगापिक्सल आणि सेकंडरी कॅमेरा २ मेगापिक्सल देण्यात आला आहे. तर फ्रंट सेल्फीसाठी १६ मेगापिक्सल कॅमेरा आहे. याचा अपर्चर एफ /२.0 आहे. खास फोटोग्राफीसाठी एवन बेस्ड फीचर्स दिले आहे. याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये पॉवर सेविंगच्या फीचरसहित ३७५0 एमएएच बॅटरी दिली आहे. याचबरोबर, ब्लॅक, रेड आणि ब्लू कलरमध्ये हा स्मार्टफोन ग्राहकांना मिळणार आहे. यामध्ये ऑनर ८ एक्स ६ जीबी+१२८ जीबी फोन १८,९९९ रुपये, ६ जीबी+६४ जीबी फोन १६,९९९ रुपये, तर ४ जीबी+६४ जीबी फोन १४,९९९ रुपयाला उपलब्ध करून देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment