Saturday 20 October 2018

भारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३00 करोडपती

भारतातून दारिद्रय़ाचे उच्चाटन होण्यास अजून बराच काळ लोटावा लागणार आहे. परंतु, उच्च आर्थिक वाढीमुळे देशात कोट्यधीशांच्या संख्येत हजारोने भर पडत आहे. कोट्यधीशांच्या संख्येत भारतात यंदा ७,३00 कोट्यधीश वाढले असल्याची माहिती समोर आली आहे.
क्रेडिट स्विसच्या अहवालानुसार, २0१७-१८ मध्ये भारतामध्ये ७,३00 लोक मिलेनियर क्लबच्या यादीत सामिल झाले आहेत. या नव्या लोकांमुळे भारतामध्ये कोट्यधीशांची संख्या ३.४३ लाख झाली आहे. या करोडपतींच्या कुटुंबियांची एकूण संपत्ती ६ ट्रिलियन डॉलर्स अर्थात ४४१ लाख कोटी रुपये आहे. २0२0 या वर्षापर्यंत देशातील करोडपतींची संख्या तब्बल ३,८२,000 वर पोहोचण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
देशातली गरिबी कमी झाली की नाही हा संशोधनाचा विषय आहे. देशातल्या करोडपतींची संख्या मात्र झपाट्याने वाढतच आहे. क्रेडिट स्विसच्या अहवालानुसार २0२३ पर्यंत भारतात करोडपतींची संख्या आणि गरीब-श्रीमंत तफावतीत फरक पडेल. अहवालात म्हटले आहे की, भेलेही भारतात संपत्तीच्या प्रमाणात वाढ झाली असेल. पण, यात प्रत्येक भारतीयाचा हिस्सा नाही. देशातील नागरिकांकडे असलेली संपत्ती अद्यापही चिंतनाचा विषय आहे. अहवालातील आकडेवारीवरून दिसते की, सुमारे ९२ टक्के लोकांकडे १0,000 डॉलरपेक्षाही कमी संपत्ती आहे. तर, दुसर्‍या बाजूला संपत्तीचा मोठा हिस्सा काही लोकांकडेच आहे. वित्तीय सेवा पुरवणारी कंपनी क्रेडिट सुएझने दिलेल्या माहितीनुसार, भारतात २0१८ च्या मध्यापर्यंत ३ लाख ४३ हजार कोट्यधीश होते. मागील वर्षी त्यांची संख्या ७,३00 ने वाढली.
या नव्या कोट्यधीशांपैकी ३,४00 जणांकडे पाच-पाच कोटी डॉलर्स म्हणजेच ३६८-३६८ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे तर १५00 जणांकडे १0 कोटी डॉलर्स म्हणजेच सुमारे ७३६-७३६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. डॉलर्सच्या तुलनेत भारताच्या एकूण संपत्तीमध्ये २.६ टक्क्यांनी वाढल्यामुळे ६,000 अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. २0२३ पर्यंत भारतात करोडपतींची संख्या आणि गरीब-श्रीमंत तफावतीत फरक पडेल.
भारतातील श्रीमंती आणि गरीब यांच्यातील तफावत ५३ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. २0२३ पर्यंत भारतातील कोट्यधीशांच्या संखेत मोठी वाढ होणार आहे. २0२३ मध्ये भारतामध्ये ५,२६,000 लोक कोट्यधीश होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment