Saturday 13 October 2018

धम्मचक्र प्रवर्तन दिन

धम्मचक्र प्रवर्तन दिन (धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन) हा भारतीय बौद्धांचा प्रसिद्ध व सर्वात प्रमुख सण आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ५ लाख अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी अशोक विजयी दशमी (दसरा) व १४ ऑक्टोबर रोजी देशभरासह जगभरातून लक्षावधी बौद्ध अनुयायी एकत्र येऊन दीक्षाभूमी येथे हा सण साजरा करतात. इ.स.पू. तिसर्‍या शतकात सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. तेव्हा पासून हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून बौद्ध अनुयायी साजरा करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी १४ आक्टोबर १९५६ रोजी नागपुरमध्ये आपल्या ५,00,000 अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला होता. ती पवित्र भूमी आज दीक्षाभूमी नावाने ओळखली जाते. हे वर्ष बुद्धाब्ध (बौद्ध वर्ष) २५00 होते. या दिवशी अनेक देशांतून आणि भारताच्या प्रत्येक राज्यांतून बौद्ध अनुयायी दरवर्षी दीक्षाभूमी, नागपुर येथे येऊन धम्मचक्र प्रवर्तन दिवस हा उत्सव साजरा करतात.

No comments:

Post a Comment