Monday 8 October 2018

अभिनेते राजकुमार

डॉयलॉगचे बेताज बादशहा अभिनेते राजकुमार यांचा जन्म ८ ऑक्टोबर १९२६ रोजी बलुचिस्तानात झाला. त्यांचे मुळ नाव कुलभूषण पंडीत होते. इन्स्पेक्टरच्या नोकरीचा राजीनामा देऊन कुलभूषण यांनी चित्रपटसृष्टीत जाण्याचा निर्णय घेतला. दोन चित्रपटानंतर त्यांनी अनमोल, सहारा, अवसर, घमंड, निलमणी और कृष्ण सुदामा या चित्रपटातून कामे केली, पण यापैकी एकही चित्रपट यशस्वी होऊ शकला नाही. महबूब खान यांच्या १९५७ मध्ये प्रदर्शित झालेल्या मदर इंडिया या चित्रपटात राजकुमार गावातील एका छोट्या शेतकर्‍याच्या भूमिकेत दिसले. या छोट्याशा भूमिकेतील दमदार अभिनयाने राजकुमार यांना केवळ हिंदी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिनेता म्हणून ख्याती मिळवून दिली. यानंतर त्यांची यशस्वी कारकिर्द सुरू झाली. दिल अपना प्रित पराई, घराना, गोदान, दिल एक मंदिर, दूज का चांद या चित्रपटांच्या यशाने तर राजकुमार यांना अभिनयसम्राटाच्या पदावर पोहचवले. काजल चित्रपटापासून राजकुमार एक सुपरस्टार अभिनेता ठरले. वक्त चित्रपटातील ह्यचिनायसेठ जिनके घर शीशेके बने होते है, वो दुसरों पे पत्थर नही फेका करते तसेच ह्यचिनायसेठ ये छुपी बच्चों के खेलने की चीज नही. हाथ कट जाये तो खून निकल आता है हे संवाद लोकप्रिय होण्यासोबत त्यांना डॉयलॉगकिंग ही पदवी प्रेक्षकांनी बहाल केली.

No comments:

Post a Comment