Monday 15 October 2018

विद्यार्थी आणि फळे

आजकाल स्पर्धा परीक्षांना बसणार्‍यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. प्रशासकीय सेवा, त्यातून मिळणारी शाश्‍वती, सामाजिक स्थान तसेच आव्हानात्मक परीक्षा म्हणून अनेकजण या वाटेकडे वळतात. यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळेच तरूणाई मोठय़ा प्रमाणावर आकृष्ट होत आहे. मात्र, व्यापक स्वरूपाच्या स्पर्धेची जाणीव ठेवूनच या परीक्षांकडे पहायला हवं. बरेचदा विद्यार्थी शिक्षणानंतर प्रदीर्घ काळ या परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी घालवतात. हा काळ त्यांच्या दृष्टीनं मानसिक ताणतणावाचा असतो. काही जण सुस्थापित करीअरवर पाणी सोडतात. स्पर्धा परीक्षांमधील यश हेच ध्येय समोर ठेवून काही वैयक्तिकदृष्ट्या महत्त्वाच्या घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. मात्र, इतकं करूनही अपेक्षित यश मिळतंच असं नाही. अशावेळी येणारं नैराश्य घातक असतं. या अपयशानं वर्तमान नव्हे तर भविष्यकाळही बाधित होतो. त्यामुळेच स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यवहार्य हवा. तसे पाहता एक वर्षाचा ११ ते १२ तासाचा नियोजित अभ्यास ही परीक्षेची किमान गरज आहे. परीक्षेची पद्धती लक्षात घ्यायला हवी. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेचं एक वर्ष गृहित धरावं. म्हणजे दोन वर्षांचा अभ्यास आणि एक संपूर्ण परीक्षेचा अनुभव ही यासाठी किमान पात्रता धरणं योग्य आहे. यात यश आलं तर सोन्याहून पिवळं, मात्र अपयश आलं तरी ते खिलाडुवृत्तीनं स्वीकारण्याची तयारी हवी. अपयश म्हणजे कारकिर्दीचा अंत नाही हे लक्षात ठेवून परीक्षेला सामोरे जा आणि यशस्वी व्हा.आजकाल स्पर्धा परीक्षांना बसणार्‍यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. प्रशासकीय सेवा, त्यातून मिळणारी शाश्‍वती, सामाजिक स्थान तसेच आव्हानात्मक परीक्षा म्हणून अनेकजण या वाटेकडे वळतात. यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळेच तरूणाई मोठय़ा प्रमाणावर आकृष्ट होत आहे. मात्र, व्यापक स्वरूपाच्या स्पर्धेची जाणीव ठेवूनच या परीक्षांकडे पहायला हवं. बरेचदा विद्यार्थी शिक्षणानंतर प्रदीर्घ काळ या परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी घालवतात. हा काळ त्यांच्या दृष्टीनं मानसिक ताणतणावाचा असतो. काही जण सुस्थापित करीअरवर पाणी सोडतात. स्पर्धा परीक्षांमधील यश हेच ध्येय समोर ठेवून काही वैयक्तिकदृष्ट्या महत्त्वाच्या घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. मात्र, इतकं करूनही अपेक्षित यश मिळतंच असं नाही. अशावेळी येणारं नैराश्य घातक असतं. या अपयशानं वर्तमान नव्हे तर भविष्यकाळही बाधित होतो. त्यामुळेच स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यवहार्य हवा. तसे पाहता एक वर्षाचा ११ ते १२ तासाचा नियोजित अभ्यास ही परीक्षेची किमान गरज आहे. परीक्षेची पद्धती लक्षात घ्यायला हवी. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेचं एक वर्ष गृहित धरावं. म्हणजे दोन वर्षांचा अभ्यास आणि एक संपूर्ण परीक्षेचा अनुभव ही यासाठी किमान पात्रता धरणं योग्य आहे. यात यश आलं तर सोन्याहून पिवळं, मात्र अपयश आलं तरी ते खिलाडुवृत्तीनं स्वीकारण्याची तयारी हवी. अपयश म्हणजे कारकिर्दीचा अंत नाही हे लक्षात ठेवून परीक्षेला सामोरे जा आणि यशस्वी व्हा.

No comments:

Post a Comment